आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसी बळावर पॉस्को प्रकल्पासाठी भूसंपादन चालूच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परादीप (ओडिशा)- प्रस्तावित वादग्रस्त पॉस्को स्टील प्रकल्पासाठी भूसंपादनास मंगळवारी सुरुवात झाली. जगतसिंगपूर जिल्ह्यात शेतजमिनींचे संपादन करताना प्रशासनाने पोलिस बळाचा वापर केला. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी त्याला जोरदार विरोध केला. त्यात लहान मुलेही सहभागी झाली होती.

भूसंपादन करताना शेतजमिनींवरील पिकांना नष्ट करण्याचे काम गेल्या दोन दिवसांपासून येथे सुरू आहे. मात्र ते हातांनी केले जात होते. मंगळवारी मात्र सपाटीकरणासाठी यंत्रांचा वापर करण्यास सुरुवात झाली, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. प्रकल्पासाठी 700 एकर जमिनींची गरज भासणार आहे. पहिल्या टप्प्यात 60 एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. रविवारी गोविंदपूरमध्ये जमीन संपादित झाली. आता ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. जमिनींचे संपादन करण्यात आल्यानंतर अधिका-या ंनी संबंधित शेतक-यांना त्याच ठिकाणी त्याचा मोबदला दिला. धनादेशाच्या स्वरूपात ही रक्कम देण्यात आली.

पोलिसांना हटवण्याची मागणी
भूसंपादन प्रक्रिया राबवताना जिल्हा प्रशासनाने पोलिस बळाचा वापर केला आहे. या भागातून पोलिसांना हटवण्यात यावे, या मागणीसाठी पॉस्को प्रतिरोध संग्राम समितीचे (पीपीएसएस) अभय साहू यांनी उपोषण सुरू केले आहे. या वेळी झालेल्या आंदोलनात नऊ शाळेतील लहान मुलेही सहभागी झाली होती.