आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरसह देशातील अनेक शहरे 'लष्‍कर'च्‍या हिटलिस्‍टवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः काश्मीरसह भारताच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ले करून मोठा घातपात घडवून आणण्‍याची योजना 'लष्कर-ए-तोयबा'ने आखली आहे, असा खळबळजनक खुलासा दहशतवादी अबू जुंदल उर्फ जबिउद्दीन अन्‍सारीने केला आहे. 'लष्‍कर'चे शेकडो प्रशिक्षित दहशतवादी भारतात घुसण्‍यासाठी सज्‍ज असल्‍याची माहितीही त्‍याने दिली आहे.
जबिउद्दीन सध्‍या दिल्‍ली पोलिसांच्‍या ताब्‍यात आहे. चौकशीदरम्‍यान त्‍याने 'लष्‍कर'च्‍या योजनांची माहिती दिली. त्‍याने सांगितले की, शेकडो प्रशिक्षित सशस्त्र दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात घुसण्‍यासाठी तयार आहेत. काश्मीरमधील शांतता दहशतवाद्यांना सहन होत नाही. त्‍यामुळे तेथील शहरी भागांमध्ये पुन्हा दहशतवाद पसरवून देशातील इतर भागात अस्तित्त्व दाखवून देण्‍याची लष्‍करची योजना आहे. 'युनायटेड जेहाद काउन्सिल'ने जम्‍मू आणि काश्मिरमध्‍ये घुसण्‍यासाठी शेकडो दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले आहे. पूंछ आणि राजौरी येथून भारतात घुसवण्याचा कट या दहशतवाद्यांनी आखला आहे. हे दहशतवादी भारतातील धार्मिक स्थळे आणि अन्य गर्दीच्या ठिकाणी हल्ले करतील. स्‍वतः जबिने पाकव्‍याप्‍त काश्मिरमध्‍ये बराच काळ घालविला आहे. तसेच लष्‍करच्‍या बड्या दहशतवाद्यांच्‍या सहवातसातही तो होता.
जबिने नेपाळमध्‍ये लष्‍करच्‍या दहशतवादी शिबिरात घेतले प्रशिक्षण
आयएसआय मेजर सूचना देत होता, जबिउद्दीन अन्सारीने दिली माहिती
मुंबई हल्ल्यात पाकचा हात असल्याचे ठोस पुरावे : चिदंबरम