आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ledies Photo Jouirnalist Homai Vyarawala Is No More

पहिल्या फोटो पत्रकार होमाई व्यारावाला यांचे निधन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बडोदा: देशातील पहिल्या महिला फोटो जर्नालिस्ट पद्मविभूषण होमाई व्यारावाला (89) यांचे रविवारी निधन झाले. गुरुवारी घरात पाय घसरून पडल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. दुपारी 4.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
फाळणीची निर्णायक बैठक तसेच स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधानांचा शपथविधी सोहळा अशा कितीतरी क्षणांना त्यांनी कॅमेर्‍यात टिपले होते. सोमवारी हिंदू पद्धतीनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. व्यारावाला पारशी होत्या. मात्र मृत्युपत्रात त्यांनी अंत्यसंस्कार हिंदू पद्धतीने व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. व्यारावाला यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून 1970 पर्यंत फोटोग्राफीच्या क्षेत्रात कारकीर्द गाजवली. या काळातील घटना, घडामोडी टिपण्याचे भाग्य त्यांना लाभले.