आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशान्‍येकडे डावेच ठरले \'उजवे\', 3 पैकी 2 राज्‍यांमध्‍ये कम्‍युनिस्‍टांकडेच सत्ता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- अर्थसंकल्‍पासोबतच आज इशान्‍येकडील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्‍यांमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी झाली. त्रिपुरामध्‍ये सत्ताधारी डाव्‍या आघाडीने गड राखण्‍यात यश मिळविले आहे. डाव्‍या पक्षांनी 60 पैकी 46 जागा जिंकल्‍या आहेत. सीपीआय (एम)ने 45 तर सीपीआयने 1 जागा जिंकली आहे.

नागालँडमध्‍येही सत्ताधा-यांनाच पुन्‍हा स्‍पष्‍ट बहुमत मिळाले आहे. नागा पीपल्‍स फ्रंटने 60 पैकी आतापर्यंत 31 जागांवर विजय मिळवून बहुमताचा आकडा पार केला. पक्षाचे नेते मुख्‍यमंत्री नेफियु रियो यांनी 12 हजार 671 मतांनी विजय नोंदविला. तर सभापती कियानेली पेसेयी यांनी 1 हजार मतांनी निसटता विजय मिळविला. कॉंग्रेसने या निवडणुकीत 57 ठिकाणी उमेदवार दिला होता. परंतु, कॉंग्रेसला फारसे यश मिळालेले नाही. केवळ दोन ठिकाणी कॉंग्रेस आघाडीवर असून राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने मात्र 2 ठिकाणी विजय मिळविला आहे. तसेच दोन ठिकाणी राष्‍ट्रवादीचा उमेदवार आघाडीवर आहे. भाजपलाही केवळ एकच जागा जिंकता आली आहे.

मेघालयमध्‍ये कॉंग्रेस आघाडीने सत्ता राखली आहे. कॉंग्रेसने एकूण 20 जागांवर विजय मिळविला आहे. याशिवाय युनाईटेड डेमोक्रॅटीक पार्टी आणि हिल्‍स स्‍टेट पीपल्‍स डेमोक्रॅटीक पार्टी या दोन सहकारी पक्षांनीही प्रत्‍येकी 4 जागा जिंकल्‍या आहेत. याशिवाय कॉंग्रेस आणखी 5 तर युडीपी 3 जागांवर आघाडीवर आहे.