आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रश्‍दी यांच्‍या जीवाला अंडरवर्ल्‍डकडून धोका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलमान रश्‍दी यांनी सुरक्षेच्‍या कारणास्‍तव भारत दौरा रद्द केला आहे. अंडरवर्ल्‍डकडून धोका असल्‍याचे रश्‍दी यांनी सांगितले आहे. रश्‍दी यांचे एक पत्र जयपूर लिटरेचर फे‍स्‍टीव्‍हलच्‍या आयोजकांनी वाचून दाखविले. त्‍यात रश्‍दी यांनी म्‍हटले आहे. की, 'या विषयावर मी आतापर्यंत कोणतेही वक्तव्‍य केले नव्‍हते. स्‍थानिक अधिक-यांनी मला संरक्षणाची खात्री दिली होती. परंतु, मुंबईतील अंडरवर्ल्‍डकडून माझी हत्‍या करण्‍यात येऊ शकते, अशी एक गुप्‍त माहिती मला देण्‍यात आली आहे. अशा अहवालांवर माझा फारसा विश्‍वास नाही. परंतु, माझ्यामुळे कार्यक्रमात अडथळा निर्माण होऊ नये. किंवा इतर साहित्यिकांचा जीव धोक्‍यात येऊ नये, असे मला वाटते.'
रश्‍दी या महोत्‍सवात व्हिडीओ कॉन्‍फरन्‍सच्‍या माध्‍यमातून संवाद साधणार आहेत. रश्‍दी यांच्‍या भारत दौ-याला विविध स्‍तरातून विरोध होत आहे. रश्दींच्या येण्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल, अशी भीती राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहेलोत यांनी गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यासोबत झालेल्या चर्चेत व्यक्त केली होती. गहेलोत यांनी व्यक्त केलेले मत आणि काही समाजघटकांना रश्दी यांच्याबद्दल असणा-या आक्षेपामुळे अलर्ट जारी करण्यात आल्याचे एका अधिका-याने सांगितले.

ऑल इंडिया मुस्लिम मजलिस-ए-मुशवरचे प्रमुख डॉ. जफारुल इस्‍लाम खान यांनी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, जर सलमान रश्दी भारतात येणार असतील तर त्यांचे स्वागत बुटाने केले जाईल. तुमच्या संघटनेने तस्लिमा नसरीनवर हल्ला करण्याचे जाहीर केले होते त्याचप्रमाणे रश्दी यांच्यावर हल्ला करणार का, असे विचारला ते म्हणाले, रश्दींना भारतात येण्यास आमचा कायमच विरोध राहील जर ते आलेच तर त्यांचे स्वागत बुटाने, चप्पलाने केले जाईल.

\'सलमान रश्दी भारतात आले तर त्यांचे बुटाने स्वागत करु\'