आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Loksabha And Assembly 's Two Thousand Members May Disqulified

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकसभा व विधानसभेचे दोन हजार उमेदवार अपात्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील खर्चाचा तपशील देण्यास टाळाटाळ करणा-या 2171 उमेदवारांना निवडणूक आयोगाने अपात्र ठरवले आहे. निवडणुकीतील पैशांच्या वापरास आळा घालण्यासाठी आयोगाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे. या उमेदवारांवर निवडणूक लढवण्यास तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. यामुळे अनेकांना आगामी लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही.

निवडणुकीतील पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी आणि निर्भय, मुक्त वातावरणात मतदान करता यावे यासाठी आयोगाने राबवलेल्या सुधारणा कार्यक्रमाचा हा एक भाग आहे. आयोगाने अपात्र ठरवलेल्या दिवसापासून पुढील तीन वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. बंदीची ही मुदत जानेवारी 2016 पर्यंत आहे. यामुळे या 2171 उमेदवारांना पुढील तीन वर्षात होणा-या विधानसभा,लोकसभा निवडणुका लढवता येणार नाहीत.कारवाई झालेल्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक 260 उमेदवार महाराष्ट्राचे आहेत. अपात्र उमेदवारांची तपशीलवार यादी आयोगाने प्रत्येक राज्यातील मुख्य निवडणूक अधिका-यांकडे पाठवली आहे.हे अधिकारी आता ही यादी जिल्हापातळीवरील अधिका-यांकडे पाठवतील.

हवशे-नवशेच जास्त
अपात्र ठरलेल्या उमेदवारांमध्ये हवशे,नवशे आणि गवशे उमेदवारच जास्त आहेत.यापैकी काही उमेदवारांनी निर्धारित 30 दिवसांच्या आत खर्चाचा तपशीलही सादर केला होता.परंतु ते सदोष असल्याने अपात्र ठरवण्यात आले.
अपात्र उमेदवार
महाराष्ट्र260
छत्तीसगड 259
हरयाणा 197
ओडिशा 188
मध्य प्रदेश 179
उत्तर प्रदेश 159
झारखंड 118
तामिळनाडू 97
इतर प्रदेश 714
कायद्याचे बोल
लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 अंतर्गत कलम 8 अ मधील पोटकलम
11 (अ), (2) आणि 10 अ नुसार उमेदवाराने निकालानंतर 30 दिवसांच्या आत खर्चाचा तपशील सादर करणे अनिवार्य आहे.
2009 - मध्येही अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती.
3275 -उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आले होते.