आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीमुळे महाबळेश्‍वरचा पारा शून्‍यावर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राज्‍यात थंडीचा आणखी जोर वाढला आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्‍वरला तर पा-याने शून्‍याची पातळी गाठली आहे. शनिवारी सकाळी झाडांनी हिमाच्छादित चादर पांघरली होती.
उत्तर भारतातही थंडीचा प्रकोप शुक्रवारीही सुरूच राहिला. गारठून टाकणारे वारे आणि धुक्याने राजधानी दिल्लीसह अन्य राज्यांमध्ये लोक हवालदिल झाले. दरम्यान, यंदा उशिरा सुरू झालेल्या या थंडीचा मुक्काम ला-निनाच्या प्रभावामुळे लांबण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दाट धुके आणि गेल्या काही दिवसांत उत्तरेत झालेल्या बर्फवृष्टीमुळे थंडीचा हा कडाका इतक्यात कमी होण्याची शक्यता नाही. उत्तरेतील ही लाट आता दक्षिणेतही पसरत असून, कर्नाटकात विक्रमी थंडी नोंदवली गेली आहे.

धुक्याने वाहतूक विस्कळीत
दिल्लीत 200 विमान उड्डाणांवर धुक्याचा परिणाम झाला. 28 उड्डाणे रद्द करावी लागली. काही विमाने लखनऊ, मुंबई मार्गाने वळवण्यात आली. दिल्लीहून जाणा-या 40 रेल्वेंचे मार्ग बदलावे लागले.

ला निनाचा प्रभाव
ज्या वेळी ला-निनाचा प्रभाव असतो तेव्हा कडाक्याची थंडी पडते. याचे एक वैशिष्ट्य म्हणजे मोसमी पाऊस ज्या काळात चांगला पडतो त्या काळात ला-निनाचा प्रभाव जाणवतो.

पिकांना फायदा
सध्या पडत असलेली कडाक्याची थंडी आगामी काळात पिकांसाठी फायद्याची असल्याचे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी सांगितले.

काय आहे ला निना?
वातावरणावर परिणाम करणारे हे दोन प्रमुख घटक आहेत. भूमध्यसागरावरील हवेच्या दाबावरून या प्रभावाची परिणामकारकता ठरते. सागरी पृष्ठभाग जेव्हा थंड होतो तेव्हा तेथून वाहणारे वारे त्या भागात थंडीचा प्रकोप वाढवतात. याला ला निना इफेक्ट असे संबोधले जाते. नेमकी याविरुद्धची परिस्थिती अल निनो च्या प्रभावामुळे निर्माण होते. ला निना जशी थंडी वाढवतो तसा अल निनो इफेक्ट तापमान वाढवतो.

पुढे काय होईल?
ला निनाच्या प्रभावामुळे आगामी काळात जगभरातच वातावरणात बदल जाणवू शकतील. काही भागांत गोठवणारी थंडी पडेल तर काही भागांत अनपेक्षित मुसळधार पाऊस पडेल. आगामी उन्हाळ्यात तापमान सरासरीपेक्षा अधिक वाढण्याचाही धोका आहे.

सागरी वा-यांचा परिणाम
समुद्राच्या पृष्ठभागावरून वाहणा-या थंड वा-याचा हा परिणाम आहे. या काळात सूर्याची प्रखर किरणे थेट पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नसल्याने वातावरण थंड होते. हाच ला निनाचा प्रभाव मानला जातो. ’
डॉ. रामचंद्र साबळे, माजी प्रमुख, हवामान विभाग, राहुरी कृषी विद्यापीठ
उत्तर भारतात थंडी परतली