आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशमाच्या साडीवर महाभारत कथा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


चंदिगड - साडी खरेदी हा महिला वर्गाचा आवडता विषय. त्यातून एखादी साडी जर विशेष असेल, तर ती खरेदी करण्यासाठी महिलांमध्ये जणू स्पर्धा लागते. चंदिगड येथे सध्या भरलेल्या राष्ट्रीय खादी प्रदर्शनात अशाच एका खास साडीच्या खरेदीसाठी महिलांची झुंबड उडते आहे. या रेशमी साडीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वसाधारण नक्षीऐवजी महाभारतातील विविध प्रसंग या साडीवर चितारलेले आहेत.

बंगालची ओळख असलेली ही साडी या प्रदर्शनात आणलेले हरी प्रजापती यांनी दिलेल्या माहितीनुसार ही एक साडी विणण्यासाठी सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागतो. महाभारतातील विविध पात्रे आणि त्यांच्याशी निगडित शेकडो प्रसंग विणकरांनी या साड्यांवर विणले आहेत. या साडीची किंमत 7200 रुपये असल्याचे हरी प्रजापतींनी सांगितले. बंगालचे प्रसिद्ध मलमल, मटका सिल्क, शांतिनिकेतनमध्ये विणलेल्या साड्या या विविध प्रकारांमध्ये महाभारत साडी महिला वर्गामध्ये अधिक प्रसिद्ध झाल्याचे दिसते.