आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra May Get 2nd Fund From Center For Draught Situation

दुष्काळाचा अतिरिक्त निधी राज्याला लवकरच मिळणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने मागणी केलेला अतिरिक्त निधी मंजुरीच्या वाटेवर असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नुकत्याच झालेल्या दिल्लीवारीत यासंदर्भात गांभीर्याने चर्चा झाल्याचे वृत्त आहे. कृषी मंत्रालयाच्या एका उच्चपदस्थ अधिकार्‍याने सांगितले की, राज्याच्या या प्रस्तावावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल. राज्य सरकारने केंद्राकडे सुमारे 2 हजार 857 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.
चव्हाण यांनी 14 ऑगस्ट रोजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची अधिकार्‍यांच्या लवाजम्यासह भेट घेतली होती. या भेटीत महाराष्ट्रासाठी अतिरिक्त निधी देण्यास केंद्र सरकार अनुकूल असल्याचे पवार यांनी चव्हाण यांना सांगितल्याचे कळते. दुष्काळ निवारण्यासाठी स्थापन कण्यात आलेल्या मंत्रिगटाचे पवार प्रमुख आहेत. यापूर्वी या मंत्रिगटाने जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी असल्याची टीका सर्वच स्तरांतून झाली होती. त्या वेळी मदतीसाठी राज्य सरकारने नव्याने प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना पवार यांनी केली होती. त्यानुसार राज्य सरकार आणि केंद्राचे प्रतिनिधी यांच्यात मुंबईत बैठक झाली होती. या बैठकीत राज्याने वाढीव निधीची मागणी पुढे ठेवली होती.
राज्याच्या प्रमुख मागण्या
- दुष्काळाचा सामना करण्यासाठी त्यासंबंधीचे निकष शिथिल करावेत.
- तत्काळ आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी पॅकेज स्वरूपात अर्थसाहाय्य द्या.
- केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने यापैकी 167 कोटी रुपयांच्या निधीला तत्त्वत: मंजुरी दिली आहे.
- डिझेलप्रमाणेच सिंचनासाठी विजेची सबसिडी देण्याची मागणी
- भूगर्भातील पाण्याचा उपसा करुन पीके वाचविण्यासाठी वाढीव अनुदान द्या.
- अपुर्‍या सिंचन प्रकल्पांसाठी पॅकेज द्या.