आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गीतिका शर्मा प्रकरणः मुख्‍य आरोपी गोपाल कांडाचे आत्‍मसमर्पण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एअरहोस्‍टेस गीतिका शर्मा आत्‍महत्‍या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि हरियाणाचे माजी मंत्री गोपाल कांडा याला रोहिणी कोर्टाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी कांडा 14 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती.
गोपाल कांडाने शनिवारी भल्‍या पहाटे दिल्‍लीतील अशोक विहार येथील पोलिस उपायुक्त कार्यालयात आत्‍मसमर्पण केले होते. दुपारी त्‍याची वैद्यकीय चाचणीही करण्‍यात आली.
गोपाल कांडाचा अटकपूर्व जामीन शुक्रवारी दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयाने फेटाळला होता. त्‍यावेळी न्‍यायालयाने कांडाच्‍या वकीलांना कडक शब्‍दात सुनावले होते. कांडा आत्‍मसमर्पण करणार असल्‍याची कुणकुण लागताच उपायुक्त कार्यालयाबाहेर प्रसार माध्‍यमांनी गराडा घातला होता. मध्‍यरात्रीनंतर गोपाल कांडाचा भाऊ गोविंद हा देखील उपायुक्त कार्यालयाबाहेर पोहोचला होता. पोलिसांनी त्‍यालाही आरोपीला शरण दिल्‍याच्‍या गुन्‍ह्याखाली अटक केली. गोपाल कांडाला आत्‍मसमर्पण करण्‍यापूर्वीच अटक करण्‍याचा पोलिसांचा प्रयत्‍न होता. सर्व ठिकाणी नाकाबंदी केली होती. एक पथक गुडगावला गेले होते. परंतु, त्‍याला अखेर अटक करण्‍यात पोलिसांना यश मिळाले नाही. कांडाला अटक करण्‍यासाठी पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीसही बजावली होती.
पोस्टमार्टम रिपोर्ट: गीतिकासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध झाल्याचे उघड
दररोज सायंकाळी भेटण्‍याच्‍या अटीवरच कांडाने गीतिकाला बनविले संचालक
गीतिकाला गर्भपातासाठी घेऊन गेली होती अरुणा?
गोपाल कांडा गीतिकावर का होता इतका मेहरबान?