Home »National »Other State» Make Water Filter Machine In Only 25v Rupees

25 रुपयांत बनवले पाणी शुद्धीकरण यंत्र

दिव्य मराठी नेटवर्क | Apr 29, 2012, 01:33 AM IST

  • 25 रुपयांत बनवले पाणी शुद्धीकरण यंत्र

चंदिगड । लाकडाचा भुसा आणि चिकण मातीपासून तयार केलेले स्वस्तातले वॉटर फिल्टर शुक्रवारी चंदिगड येथे एका प्रदर्शनात सादर करण्यात आले.
ओडिशामधील इन्स्टिट्यूट ऑफ मिनरल मटेरिअल टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. बी. के. मिश्रा यांनी हे उपकरण तयार केले आहे. ‘टॅराफिल वॉटर फिल्टर’ नावाच्या उपकरणाची किंमत फक्त 25 रुपये आहे.
डॉ. मिश्रा यांनी सांगितले की, ओडिशाच्या खाण परिसरातील पाण्यात 90 टक्के लोह आणि खनिजांचे प्रमाण जास्त असल्याने लोकांना किडनी व पोटाचे विकार होत असल्याचे त्यांना आढळून आले. चिकण मातीचा गोळा आणि लाकडाचा भुसा त्यांनी एकत्र जाळला असता भुसा जळाला आणि गोळ्याला सूक्ष्म छिद्रे पडली. नंतर एका प्लॅस्टिकच्या उपकरणात हा गोळा बसवला. अशा पद्धतीने हे वॉटर फिल्टर तयार करण्यात आले. यातून गाळलेल्या स्वच्छ पाण्याला मातीचा सुगंध येतो आणि पाच वर्षे हे फिल्टर काम करते, असे डॉ. मिश्रांनी सांगितले.
भंगार वाहनातून तयार केले पाणी उपसा इंजिन

Next Article

Recommended