आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maldives Former President Take Shellter In Indian Embassy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष भारतीय वकिलातीत शरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


माले/ नवी दिल्ली - मालदीवचे माजी राष्‍ट्राध्यक्ष मोहंमद नाशीद यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केल्यानंतर बुधवारी त्यांनी भारतीय वकिलातीत आश्रय घेतला. या मुद्द्यावर भारताची भूमिका ठरवण्यासाठी राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार व परराष्‍ट्र सचिव स्तरावर बैठका सुरू आहेत.

भारतीय उपखंडातील माझी सुरक्षा व स्थैर्यासाठी मी भारतीय दूतावासात आश्रय घेतला आहे, या आशयाचे ट्विट नाशीद यांनी केले आहे. भारतीय अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशीद यांनी भारतीय उच्चायुक्तांची वेळ मागितली आहे. मात्र, त्यांची बैठक कधी होणार हे स्पष्ट होऊ शकले नाही. नाशीद यांनी अटक वॉरंटला आव्हान दिले आहे, असे अधिका-यांनी सांगितले.

दरम्यान, मालेमध्ये दंगलविरोधी पोलिस पथकाने भारतीय दूतावासाला घेरले असून या मार्गावर वाहनांसाठी अडथळे उभे करण्यात आले आहेत. नाशीद बाहेर येण्याची पोलिस वाट पाहत आहेत. भारतीय दूतावासात पोलिस प्रवेश करणार नाहीत, असे मालदीवचे राष्‍ट्रा ध्यक्ष मोहंमद वाहिद यांच्या कार्यालयातील प्रवक्ते इमाम मसूद यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या वर्षी पायउतार झाले
नाशीद यांच्या मालदिवन डेमोक्रेटिक पार्टीतील नेत्यांनी भविष्यातील रणनीती ठरवण्यासाठी बैठक बोलावली आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर नाशीद यांना भारत दौ-यांची परवानगी देण्यात आली होती. त्यांचा दौरा 9 फेबु्रवारीपर्यंत होता. मात्र, ते दोन दिवसांनी मालदीवला परतले. न्यायाधीशांच्या अटकेमुळे आंदोलनाचा सामना करावा लागलेल्या नाशीद यांना गेल्या वर्षी फेरवारी महिन्यात पायउतार होणे भाग पडले.

का आले शरण ?
क्रिमिनल कोर्टाचे मुख्य न्यायाधीश अब्दुल्लाह मोहंमद यांना जानेवारी 2012 मध्ये नजरकैदेत ठेवल्याप्रकरणी नाशीद यांच्याविरुद्ध खटला सुरू आहे. हुलहुमाले न्यायदंडाधिकारी न्यायालयात 10 फेब्रुवारीच्या सुनावणीस गैरहजर राहिल्याबद्दल रविवारी त्यांच्याविरुद्ध समन्स जारी करण्यात आले. समन्सला प्रतिसाद न दिल्यामुळे मंगळवारी रात्री त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले.