आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malnutrition Problem Chhikki Good For Child Health

केंद्राच्या आयुष विभागाची योजना : कुपोषण रोखेल चिक्की

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - देशात लहान मुलांचे कुपोषण ही समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करीत असून, गूळ व सातूच्या चिक्कीचा वापर करून कुपोषण नष्ट करण्याची योजना आयुर्वेद खात्याने आखली आहे.
केंद्र सरकारच्या आयुष विभागाच्या सूचनेनुसार ही योजना प्रायोगिक स्वरूपात प्रथम जयपूरमध्ये आणि नंतर संपूर्ण देशभर राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत कुपोषित बालकांना हिवाळ्यात 50 ग्रॅम चिक्की आणि उन्हाळ्यात 50 ग्रॅम सातूची चिक्की दररोज एक वर्षभर देण्यात येईल.
जयपूरमधील झोपडपट्टीत राहणाºया तीन ते पाच वर्षे वयोगटातील 6 हजार
मुलांसाठी एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. अद्ययावत आकडेवारीनुसार राजस्थानमध्ये 44 टक्के मुले कुपोषित, तर 11 टक्के अतिकुपोषित आहेत.
आयुर्वेद विभागाने माहिती दिली की, योजना सुरू करण्यापूर्वी झोपडपट्टीत राहणाºया मुलांना जंताचे औषध देण्यात येईल. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून हेल्थ कार्ड तयार केले जाईल. वर्षभर या मुलांचे नियमित मॉनिटरिंग करून पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. या पायलट प्रोजेक्टचे परिणाम समाधानकारक असल्यास केंद्र सरकार ही योजना देशभर लागू करू शकते. आरोग्य मंत्री दुर्रूमियां यांनी सांगितले की, कुपोषण संपवण्यासाठी आयुर्वेद विभागाने 2.90 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला असून, अर्थखात्याकडे हा प्रस्ताव पाठवला जाईल. योजना मंजूर झाल्यास खर्चापैकी 85 टक्के वाटा केंद्र सरकार आणि 15 टक्के वाटा राज्य सरकार उचलणार आहे.

अशी तयार होईल चिक्की
गुळाच्या 50 ग्रॅमच्या चिक्कीत 24 ग्रॅम गूळ, 14 ग्रॅम शेंगदाणे, 10 ग्रॅम तीळ. तसेच दोन ग्रॅममध्ये अश्वगंधा, शतावरी, आवळा आणि सुंठीच्या चूर्णाचे मिश्रण करण्यात येईल. त्याचप्रमाणे सातूच्या चिक्कीत साखर 20 ग्रॅम, भाजलेले चणे 8 ग्रॅम, भाजलेले गहू 6 ग्रॅम, भाजलेले जव 6 ग्रॅम, खाद्य तेल 8 ग्रॅम. तसेच दोन ग्रॅममध्ये शतावरी, गुडुची, आवळा आणि सुंठीचे चूर्ण मिसळून सातूची चिक्की तयार
केली जाईल.

तज्ज्ञांचे मत
गुळाची औषधीयुक्त चिक्की आणि सातूमध्ये मुलांच्या वाढीसाठी आवश्यक कॅल्शियम, प्रोटीन, ऊर्जा, जीवनसत्त्वे असे घटक असल्याने त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे विकसित होते. ही चिक्की खाल्ल्याने अनेक संसर्गजन्य रोगांपासूनही मुलांचा बचाव होईल.
डॉ. हरिसिंह सोळंकी, (बालरोग तज्ज्ञ)