आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ममता बॅनर्जींकडून न्यायालयाचा अवमान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विधानसभेत न्यायालयाविरोधात केलेल्या वक्तव्याने अडचणीत आल्या आहेत. वकिलांनी आणि बार असोसिएशनने ममतांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. याबरोबर वकिलांनी कोलकाता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात खटला चालविण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल केली.
न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी ममता यांच्या वक्तव्याची स्युमोटोद्वारे दखल घेण्याची मागणी वकिलांनी त्यांची भेट घेऊन केली. पटेल यांनी ही मागणी फेटाळत तुम्ही ती दाखल करू शकता, असे सांगितले. त्यानंतर ज्येष्ठ विधिज्ञ विकास भट्टाचार्य यांनी ममतांविरुद्ध खटला दाखल केला. न्यायालयाने ममता यांच्या भाषणाची सीडी मागितली असून वृत्त प्रसिद्ध व प्रसारित करणार्‍या प्रसारमाध्यमांना नोटीस पाठविली. या वृत्ताबाबत तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र दाखल करून वृत्ताची विश्वासार्हता सिद्ध करण्यास सांगितले आहे.
मंगळवारी केले विधान- 14 ऑगस्ट रोजी पश्चिम बंगाल विधानसभेच्या प्लॅटिनम ज्युबली कार्यक्रमात ममता यांनी हे वक्तव्य केले होते. कोलकातातील प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, ममता यांनी म्हटले की, पैशाच्या जोरावर न्यायदान होत असल्याचे आजवर मी अनेक न्यायालयांत पाहत आहे. जम्मू काश्मीर पॅँथर्स पार्टीचे प्रमुख भीम सिंह मीणा यांनी ममताविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.