आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mamata Didi Author : Showing At Kolkata Books Fair

ममतादीदी साहित्यिक : कोलकता पुस्तक प्रदर्शनात नवी ओळख

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कोलकाता - राजकीय मैदानात मुलूखमैदानी तोफ असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आत एक संवेदनशील कवयित्री आणि चित्रकार दडलेली आहे. त्याचा प्रत्यय कोलकात्यात सुरू असलेल्या ग्रंथ प्रदर्शनातून आला आहे. यंदाच्या प्रदर्शनात ममतांची पाच नवीन पुस्तके वाचकांना आकर्षित करू लागली आहेत. 2011 मध्ये पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर ममता बॅनर्जींनी जनतेच्या कामांबरोबरच आपल्या प्रतिभेलाही तितकेच महत्त्व दिले आहे. हेच त्यांच्या पाच पुस्तकांच्या प्रदर्शनातून जाणवते. मानवी वेदना, मानवी हक्क, राजकीय संघर्ष यासारखे सामान्य माणसाशी संबंधित प्रश्न हे ममतांच्या लेखनाचे विषय आहेत.

कोणती पुस्तके ?
‘एक पालेक एक झालेक’, ‘भाबनार साथी’ (वैचारिक), ‘से नेई’ (निबंध व कविता), ‘पचंदर कबिता’ (कविता) , ‘अर्थ साँग’ या पुस्तकांचा प्रदर्शनात समावेश आहे.

फेसबुकवरून पोस्ट
मुख्यमंत्र्यांनी आपल्या वाचकांना नवीन साहित्यकृतीची माहिती मिळावी म्हणून आपल्या नवीन पुस्तकाचे मुखपृष्ठ फेसबुकवरून पोस्ट केले आहे.
व्यग्र असूनही लेखन
गेल्या काही वर्षांपासून ममता बॅनर्जी यांची पुस्तके वाचकांच्या भेटीला येत आहेत. मुख्यमंत्री म्हणून व्यग्र असतानाही वेळ काढून नियमित लेखनावर त्यांचा भर आहे. त्यामुळे कोलकात्यातील प्रत्येक मोठ्या ग्रंथ प्रदर्शनात त्यांचे नवीन पुस्तक विक्रीला उपलब्ध असल्याचे पाहायला मिळते.

दैनंदिन उपक्रमांविषयी मी लोकांना नियमितपणे माहिती देते. राजकीय संघर्ष, मानवी हक्क, प्रेम, निसर्ग, कविता, पेंटिंग आदींविषयी अपडेट करायला मला आवडते. त्यामुळे फेसबुकवरून लोकांना माझ्या नवीन साहित्याविषयी आवर्जून कळवले आहे.
ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री