आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Man Arrested For Posting Cartoons Of PM And Mulayam Facebook

फेसबुकवर पंतप्रधानांचे वादग्रस्‍त व्‍यंगचित्रे पोस्‍ट करणा-यास अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ- पंतप्रधान मनमोहन सिंग, केंद्रीय मंत्री कपिल सिब्‍बल आणि समाजवादी पक्षाचे प्रमूख मुलायम सिंग यादव यांच्‍याबद्दल जातीयवाद वाढवणारे चिथावणीखोर मजकूर आणि व्‍यंगचित्रे सोशल नेटवर्किंग साईट्स फेसबुकवर पोस्‍ट करणा-या एका व्‍यक्‍तीस आग्रा येथून अटक करण्‍यात आली.

आग्रा येथील दयालबाग भागात राहणा-या संजय चौधरीला सोमवारी मध्‍यरात्री उशिरा अटक करण्‍यात आली. त्‍याच्‍याकडून लॅपटॉप, सिम कार्ड व डेटा कार्डही जप्‍त करण्‍यात आले. कायदा व सुव्‍यवस्‍था सुरळीत राहण्‍यासाठी त्‍याच्‍यावर ही कारवाई करण्‍यात आल्‍याचे एका वरिष्‍ठ पोलिस अधिका-याने म्‍हटले आहे.

संजय चौधरी आपल्‍या फेसबुक अकांऊंटवरून या तिन्‍ही नेत्‍यांची बदनामी करणारे व्‍यंगचित्रे पोस्‍ट करत असत. अटकेनंतर लगेचच वादग्रस्‍त पोस्‍ट त्‍याच्‍या फेसबुक प्रोफाईलवरून हटवण्‍यात आले. त्‍याचबरोबर त्‍याचे अकाऊंटही बंद करण्‍यात आले आहे. चौधरी हा व्‍यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असून तो एका शाळेचा चेअरमनदेखील आहे.