आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Man Failed To Rape The Girl Wounded Rod In The Mouth In Delhi

दिल्‍लीत पुन्‍हा बलात्‍काराचा प्रयत्‍न, विरोध करणा-या मुलीच्‍या तोंडात घातला लोखंडी रॉड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दिल्‍लीतील सामूहिक बलात्‍काराचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. दक्षिण दिल्‍ली येथील उच्‍चभ्रू भाग असलेल्‍या लाजपत नगर येथे एका केबल ऑपरेटरने 24 वर्षीय तरूणीवर बलात्‍कार करण्‍याचा प्रयत्‍न केला.

पीडित तरूणीने जेव्‍हा ओरडण्‍याचा प्रयत्‍न केल्‍यानंतर आरोपीने तिच्‍या तोंडात लोखंडी रॉड घातला. आरोपी अनिल कुमारला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. मात्र हे प्रकरण मंगळवारी उजेडात आले. पीडित तरूणीला एम्‍स रूग्‍णालयात दाखल करण्‍यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्‍याचे सांगण्‍यात येते.

घटनेवेळी पीडित तरूणी घरात एकटी होती. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अनिल कुमार केबल ऑपरेटरचे काम पाहतो. त्‍याच्‍या घराशेजारीच पीडित तरूणी राहते. सोमवारी संध्‍याकाळी पीडित तरूणीच्‍या घरी कोणी नसताना तो तिथे जाऊन लपला. रात्री जेव्‍हा ती घरी आली, तेव्‍हा त्‍याने तिच्‍यावर बलात्‍कार करण्‍याचा प्रयत्‍न केला. तिने ओरडण्‍याचा प्रयत्‍न केल्‍यानंतर तिच्‍या तोंडात रॉड टाकला. मात्र, तोपर्यंत आजूबाजूला राहणारे लोक जमा झाले होते. त्‍यामुळे त्‍याचा बलात्‍काराचा प्रयत्‍न फसला.