आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बेंगळूरू - भारत पुढील वर्षी मंगळावर पाऊल ठेवण्याची तयारी करू लागला आहे. मंगळ ग्रहावरील वातावरण आणि भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी मंगळ मोहीम हाती घेण्याच्या योजनेवर युद्धपातळीवर काम करण्यात येत आहे. भारताच्या या मोहिमेमुळे आशिया
खंडात मंगळ मोहिमेच्या स्पर्धेचे नवे पर्व सुरू होण्याची शक्यता आहे. मंगळावर मानवविरहित अंतराळ यान पाठवण्याच्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूरी दिली. पुढील वर्षी नोव्हेंबर महिन्यात ही मोहिम सुरू करण्यात येणार आहे. इस्रोचे संचालक देवीप्रसाद कर्णिक यांनी सांगितले की, सरकारकडून हिरवी झेंडी मिळाल्याबरोबर 2013मध्येच ही मोहीम सुरू केली जाणार आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून 320 टन वजनाच्या भारतीय उपग्रह प्रक्षेपक वाहनाच्या साहाय्याने अंतराळ यान मंगळावर पाठवण्याची योजना आहे. या मोहिमेवर 4 ते 5 अब्ज रुपये खर्च होणार आहे. 2012च्या अर्थसंकल्पात सरकारने या मोहिमेसाठी 1.22 अब्ज रुपयांची तरतूद केली आहे. 1963मध्ये अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर भारताने स्वत:चे उपग्रह, प्रक्षेपक विकसित केले.
2008 मध्ये भारताने चांद्रयान-1 हे मानवविरहित यान चंद्रावर पाठवले होते. चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे या मोहिमेत हाती लागले.
2013 मध्ये श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून मंगळावरील स्वारीच्या मोहिमेस प्रारंभ होण्याची शक्यता आहे.
05 अब्ज रुपये खर्च मंगळ मोहिमेवर अपेक्षित आहे. केंद्र सरकारने चालू वर्षीच्या अर्थसंकल्पात 1.22 अब्ज रुपयांची तरतूद केली आहे.
42 मोहिमा आजपर्यंत मंगळावर झाल्या आहेत. त्यापैकी अर्ध्याच यशस्वी झाल्या आहेत. त्यात अमेरिका, फ्रान्स, चीन, रशियाचा समावेश आहे.
उद्देश काय ?
मंगळावरील जीवन, जलवायुमान, भौगोलिक परिस्थिती, उत्पत्ती आणि विकासाची माहिती गोळा करण्याबरोबरच मंगळावर जीवसृष्टी शक्य आहे काय, याचा शोध घेणे हा भारताच्या मंगळ मोहिमेचा मुख्य हेतू आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.