जयपूर- आपल्या वादग्रस्त विधानांनी कायम चर्चेत राहणारे काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काँग्रेसचे चिंतन शिबिराच्या दुस-या दिवशी अय्यर यांनी म्हटले आहे की, पंतप्रधानपदाच्या दावेदारीवरुन भाजपचे नेते कुत्रे-मांजरासारखे लढत आहेत. अय्यर यांनी अशावेळी हे वक्तव्य केले ज्यावेळी त्यांना विचारले की भाजप म्हणत आहे की, काँग्रेस पक्ष पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्यापासून स्वत:ला वाचवत आहे.
संघाची कठपुतळी आहे भाजप- अय्यर यांनी म्हटले आहे की, भाजपने प्रथम आपला पंतप्रधानाचा उमेदवार घोषित करावा. त्यांचे नेते तर आपआपसात कुत्रे-मांजरासारखे लढत आहेत. भाजप आमच्यासारखे चिंतन शिबिर घेऊच शकत नाही. कारण तो पक्ष संघाची कठपुतळी असून, भाजपचे नेते काय चिंतन करणार?
आम्ही तर असेच जिंकू- जर भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केले तर काँग्रेसला निवडणूक लढविण्याची गरजच नाही. आमचा पक्ष तर त्यावेळी सहजच निवडणूक जिंकेल. जर मोदींना भाजपने नेता बनविले तर एनडीएही कोलमडून जाईल. आम्हाला निवडणूक लढण्याची गरज पडणार नाही. आम्ही तर सहज आणि असेच जिंकू असेही अय्यर यांना वाटते.
पक्ष आणि सरकारमध्ये ताळमेळ कमी- अय्यर यांनी काँग्रेस पक्षात आणि सरकारमध्ये ताळमेळ कमी असल्याचे म्हटले आहे. सरकारने पक्षाचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधींच्या नेतृत्वाबाबत अय्यर म्हणतात की, याबाबतचा निर्णय स्वत: राहुल गांधींनीच घ्यायचा आहे. जर ते पुढे आले तर त्यांचे स्वागतच होईल.