आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Manmohan Singh And Sonia Gandhi Hits Back At Anna Hazare And Ramdev Baba

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नैराश्याने ग्रासलेले लोक अफवा पसरवताहेतः पंतप्रधान, सोनियांचा अण्‍णांवर पलटवार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः अण्णा हजारे आणि रामदेवबाबा यांच्या संयुक्त आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी सोमवारी केंद्र सरकार आणि काँग्रेसने दोघांवरही पलटवार केला. नैराश्याने ग्रासलेले लोक सरकारविरुद्ध अफवा पसरवत असल्याची टीका पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केली. या लोकांविरुद्ध कठोर कारवाईची गरजही त्यांनी प्रतिपादीत केली. सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांना क्लिन चिट देत विरोधी पक्षांचा समाचार घेतला. केंद्र सरकार, काँग्रेस आणि युपीएच्या घटक पक्षांना मुद्दाम लक्ष्य केले जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले.


सोनिया म्हणाल्या..

22 मे रोजी यूपीए सरकारने आपल्या दुसर्‍या कार्यकाळात तीन वष्रे पूर्ण केली. या निमित्ताने सरकारची कामगिरी सादर केली. हेच आपल्या यशाचे दस्तऐवज आहेत.
धोरण आखणे सोपे आहे, त्याची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने होते त्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. बहुतेकवेळा धोरणे लागू करण्याच्या कामी राज्यांची भूमिकाच अधिक महत्त्वाची असते.
यात बिगर काँग्रेसी सरकारे अपेक्षित सहकार्य करत नाहीत. तरीही केंद्र सरकारने आपल्या परीने पूर्ण प्रयत्न केले आहेत.

सरकारबद्दल..
भ्रष्टाचाराविरुद्ध सरकारनेही आघाडी उघडली आहे. प्रशासनात पारदर्शकता यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रशासकीय, कायदेशीर पातळीवरील कारवाई याचा पुरावा आहे.
देशाची अर्थव्यवस्था कठीण परिस्थितीतून जात आहे. जागतिक स्थिती याला जबाबदार आहे.
या कठीण काळात आपला आत्मविश्वास टिकवून ठेवायला हवा.
अफवांना तोंड देत असताना पक्ष कार्यकर्त्यांनी सरकारच्या जमेच्या बाजू लोकांपर्यंत पोहचवाव्यात.

पंतप्रधान म्हणाले..
टीम अण्णा आणि रामदेवबाबा यांचे नाव न घेता पंतप्रधान म्हणाले, नैराश्याने ग्रासलेले काही लोक सतत सरकारविरुद्ध अफवा पसरवत आहेत.
परदेशातील बँकांमध्ये असलेल्या काळ्या पैशाचा सांगितला जात असलेला आकडा काल्पनिक आहे.
परदेशातील हा सर्व काळा पैसा एकदम देशात आणणे केवळ अशक्य आहे.

लक्ष्य '2014'
येत्या काळात काही राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. 2014 मध्ये लोकसभेची निवडणूक होईल. याची तयारी आपण सुरू करायला हवी.
जेवढी शक्ती आपण वायफळ कामात खर्च करतो त्यातील निम्मा वेळ पक्षासाठी दिला तर आपली शक्ती दुपटीने वाढेल.

पंतप्रधानांचा पलटवार

> काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत अण्णा-रामदेवबाबांवर टीका
> अफवा पसरवणार्‍यांवर कारवाई व्हावी
बैठकीत सोनियांचा दरारा : विरोधकांवर आक्रमक तर काँग्रेस नेत्यांना कानपिचक्या
टीम अण्णाचा रामदेव बाबांसोबत एकतर्फी तह
रामदेव बाबांची पंतप्रधानांना हाकः ‘जागो मोहन प्यारे...’