आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनरेगा कागदावरच यशस्वी : योजनेतील उणिवांवर पंतप्रधानांचे बोट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) अंतर्गत मजुरीचे वेळेवर वाटप होत नाही, तसेच या योजनेचे मूल्यांकनही योग्य पद्धतीने होत नसल्याबद्दल पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आश्चर्य व्यक्त केले. यातील त्रुटी दूर करण्याचे निर्देश त्यांनी नियोजन आयोगाला दिले. ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे तयार करण्यात आलेल्या मनरेगा परीक्षण हा 122 पानी अहवाल पंतप्रधानांनी जारी केला. मनरेगा ही संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारची कागदावरची सर्वाधिक यशस्वी योजना असल्याचे सांगितले. पंतप्रधान डॉ. सिंग म्हणाले की, मनरेगात पंचायत राज संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. संसाधनांचा योग्य पद्धतीने वापर करणे संस्थांच्या हाती आहे.
भ्रष्टाचाराची लागण : रमेश- मनरेगा योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचे सरकारने कबूल केले. केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री एस. रमेश यांनी सांगितले की, लेखापरीक्षण केले तर भ्रष्टाचाराला आळा बसेल.
आकड्यांत मनरेगा- मनरेगात अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीच्या 51% कुटुंबांना तर 41% महिलांना काम मिळाले.
- 2010-11 मध्ये साडेपाच कोटी कुटुंबांना 250 कोटी दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्यात आला.
- बँका आणि पोस्टात 10 कोटी खाती उघडण्यात आली. 80 टक्के व्यवहार याच माध्यमातून होतो.
मनरेगा घोटाळा : सीबीआय चौकशी हाच एकमेव मार्ग