आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Many States Agreed For Common Engineering Entrance Test

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभियांत्रिकी प्रवेशः ‘जेईई’ला राज्यांची संमती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी संयुक्त प्रवेश परीक्षा घेण्यास बहुतांश राज्यांनी संमती दर्शवली असून, आयआयटीमध्ये निवड व प्रवेशासाठी स्वतंत्र व्यवस्थेवर मात्र राज्यांनी आक्षेप नोंदवले आहेत. दरम्यान, केंद्रीय मनुष्यवळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी राज्यांना असलेल्या या हरकतीवरही तोडगा काढण्याचे संकेत दिले आहेत.
मंगळवारी 2013 वर्षासाठी सामायिक प्रवेशपूर्व परीक्षा घेण्याच्या प्रस्तावाववर राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांची बैठक झाली. यात कपिल सिब्बलही उपस्थित होते. आयआयटी व इतर केंद्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यावर बिहारसह अनेक राज्यांनी आक्षेप घेतला आहे. काँग्रेसशासीत केरळ व समाजवादी पार्टीची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशाने सामायिक प्रवेशपूर्व परीक्षेला विरोध दर्शवला. पश्चिम बंगालकडून या बैठकीस कोणीही उपस्थित नव्हते.
निर्णय राज्यांवर सोपवला
राज्यांना त्यांच्या अखत्यारीतील अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा घेणे बंधनकारक नाही, परंतु एखादे राज्य अशी व्यवस्था लागू करत असेल, तर या परीक्षेकरता केंद्राकडून हिंदी व इंग्रजीसह स्थानिक भाषेतून प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जातील, असे सिब्बल यांनी सांगितले आहे.
राज्यांचे आक्षेप
केंद्राच्या प्रस्तावानुसार आयआयटीला एन.आय.टी. व आय.आय.आय.टी.पेक्षा वेगळी निवड व प्रवेश प्रक्रिया घेण्याचा अधिकार असेल. परंतु राज्यांचा यास आक्षेप असून, आयआयटी निवड व प्रवेशासाठी वेगळी पद्धत न ठेवता समान पद्धत असावी असे म्हणणे आहे. राज्यांच्या या हरकतीवर विचार करण्याचे आश्वासन केंद्राने दिले आहे.
सरकारचा प्रस्ताव
2013 पासून सर्व केंद्रीय अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी संयुक्त प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश ‘जेईई मेन’ व ‘जेईई अ‍ॅडव्हान्स’ परीक्षा देशभरात एकाच दिवशी दोन सत्रात होणार बारावीचे गुण या परीक्षेसाठी महत्त्वाचे असून पर्सेंटाईल पद्धतीने या गुणांचा विचार होईल.
आयआयटी प्रवेशासाठी बारावी तसेच जेईई मुख्य परीक्षेतील गुणांच्या 50/50 टक्के वेटेजच्या आधारे स्क्रीनिंग करण्यात येईल. यामध्ये यशस्वी होणा-या 50 हजार उमेदवारांच्या जेईई अ‍ॅडव्हांस परीक्षेतील कामगिरीच्या आधारावर आयआयटी प्रवेशाची मेरिट लिस्ट तयार होईल. एनआयटी, ट्रिपल आयटी तसेच इतर केंद्रीय संस्थांमध्ये प्रवेशासाठी बारावी, जेईई मेन व जेईई अ‍ॅडव्हान्स या परीक्षांच्या गुणांचे 40:30:30 असे वेटेज असेल. जेईई अ‍ॅडव्हॉन्स परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करण्यासह इतर शैक्षणिक कार्याची जबाबदारी आयआयटीकडे असेल तर प्रशासकीय व इतर जबाबदाºया सीबीएसईकडे असतील.


पुढे काय?
राज्यांनी समान निवड प्रक्रियेत सहभागी होण्याबाबतचा निर्णय केंद्राला 30 जूनपर्यंत देणे अपेक्षित आहे. जेईई मेन व जेर्ईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी बारावीच्या गुणांचे वेटेज किती असावे याबाबतही राज्यांनी आपले मत द्यायचे आहे. या नवीन प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर माहिती केंद्राकडून आॅगस्टमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे.