आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्‍हा परिषद अध्‍यक्षांच्‍या ताफ्यावर माओवाद्यांचा हल्‍ला, 11 जवान शहिद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गढवाः झारखंडच्‍या नक्षलप्रभावित गढवा जिल्‍ह्याच्‍या जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा सुषमा मेहता यांच्‍यावर आज दुपारी माओवाद्यांनी हल्‍ला केला. त्‍यात 11 पोलिस जवान शहिद झाले आहेत. घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर ताफा घटनास्‍थळी पाठविण्‍यात आला असून माओवाद्यांसोबत चकमक सुरु आहे. माओवाद्यांनी सुषमा मेहता व त्‍यांच्‍या सुरक्षारक्षकाला बंधक बनविले होते. नंतर त्‍यांना मुक्त करण्‍यात आले.
माओवाद्यांनी सुषमा मेहता यांच्‍या ताफ्यावर हल्‍ला केला. मार्गामध्‍ये माओवाद्यांनी सुरुंगस्‍फोट घडविले. या स्‍फोटात भंडरीया पोलिस ठाण्‍याचे वरीष्‍ठ निरिक्षक राजवीर चौधरी शहिद झाले. घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणावर पोलिस तसेच केंद्रीय राखीव दलाच्‍या जवानांचा ताफा घटनास्‍थळी पाठविण्‍यात आला. सुत्रांच्‍या माहितीनुसार 3 पोलिस जवान गंभीर जखमी झाले असून ते माओवाद्यांच्‍या ताब्‍यात आहेत. या हल्‍लयातून सुषमा मेहता तसेच गट विकास अधिकारी वासुदेव महतो थोडक्‍यात बचावले. माओवाद्यांनी पोलिसांच्‍या 13 बंदुकाही लुटुन नेल्‍या आहेत.

असा झाला हल्‍ला
स्‍थानिक ग्रामस्‍थ विविध मागण्‍यांसाठी धरणे आंदोलन करीत होते. त्‍यांनी रस्‍ताही अडवून ठेवला होता. यांच्‍यासोबत चर्चा करण्‍यासाठी सुषमा मेहता आणि वासुदेव महतो तिथे जात असतानाच माओवाद्यांनी सुरुंगस्‍फोट घडविला. हा परिसर अतिशय दुर्गम असून दाट जंगलाने वेढलेला आहे. त्‍यामुळे कुमक पोहोचायलाही विलंब लागला.
हल्‍ल्यानंतर माओवाद्यांनी दोन स्‍थानिक पत्रकारांमार्फत संदेश पाठविला. त्‍यात म्‍हटले आहे की, 'पोलिसांनी त्‍यांच्‍या एका मोठ्या नेत्‍याला गुप्‍त ठिकाणी ताब्‍यात ठेवले आहे. तसेच पोलिस आमच्‍या विरोधात मोहिम राबवित आहे. त्‍यामुळे आम्‍ही हा हल्‍ला केला आहे.' त्‍यानंतर पोलिसांच्‍या बंदुका घेऊन ते पळून गेले.
आमदारांच्या फार्म हाऊसवर माओवाद्यांचा कब्जा