आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात राष्ट्रीय छात्र संघ अर्थात एनसीसीच्या दलात सर्वाधिक महाराष्ट्राचे कॅडेट सहभागी होत असून यात 36 मुले आणि पंधरा मुलींचा सहभाग आहे. एनसीसीच्या एकूण दलात 76 कॅडेट असतात. यापैकी सर्वाधिक महाराष्ट्रातून आले असून आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. त्यामुळे हा एकप्रकारे राज्याचा बहुमान ठरला आहे.
स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत होणारे संचलन हे विद्यार्थ्यांयाठी एक वेगळा अनुभव देणारे असते. त्यामुळे त्यात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस असते. या वर्षी महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये औरंगाबादची दीपाली श्रीखंडे, झीनत पठाण, अहमदनगरचे नंदू तरल, मुंबईचे अंकित जळगावकर, सनतकुमार तिवारी, तर पुण्याचे विशाल कुंभार, राजीव कुमार, पी. कृष्णा रेड्डी आणि अमरावतीच्या छाया पवार यांना गार्ड ऑफ ऑनरचा मान मिळाला आहे. याशिवाय औरंगाबादचे प्रशांत मांडे, अविनाश भोसले, सागर चौबे, अजित काटे, श्रीकांत राठोड, बी. के. किशोर दामरसिंग, सिद्धार्थ धरांदले, केतन मकोने, जयदीप मुंडे, सनोबर वासीम हाश्मी, राजसिमरन चिम्मा, तेजस्विनी पाटील यांना राजपथावर संचलन करण्याचा बहुमान मिळणार आहे.
राजपथावर प्रजासत्ताक दिनी संचलन करण्याचा मान विविध संरक्षण दलांसोबत एनसीसीलाही मिळतो. देशातील शाळा, कॉलेजातून एनसीसीच्या कॅडेटची निवड केली जाते. राजपथावर संचलन करण्याचा बहुमान मिळणे हे एनसीसीमध्ये सर्वाधिक सन्मानाचे मानले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.