आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मारुती’चा किंमतवाढीचा ‘टॉप गिअर’!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मारुती सुझुकी इंडियाने डिझायर ही सिडान मोटार वगळता अन्य मोटारींच्या किमतीत वाढ केली आहे. सरसकट सर्व वाहनांच्या किमती 0.3 टक्क्यांपासून ते 3.4 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. जनरल मोटर्सनेही किमती वाढवल्या.
एसएक्स 4 सिडानच्या किमतीत 2 हजार 400, तर डिझेल स्विफ्टमध्ये सरासरी 17 हजारांची वाढ होण्याची शक्यता आहे. एसएक्स 4 ची किंमत 7 ते 9.11 लाख, स्विफ्ट डिझेल 5.27 ते 6.47 लाखांदरम्यान (दिल्ली) होती.
सर्वच मॉडेल महागले
मारुती 800 पासून ते किझाशी या टॉप एन्ड मोटारीपर्यंत सर्व मॉडेल्सच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. परंतु पुढील महिन्यात बाजारात येणाºया सिडान प्रकारातील डिझायर मोटारीच्या किमतीत मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. जनरल मोटर्स इंडियाने देखील आपल्या मोटारींच्या किमती 0.5 ते 1.75 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. त्यामुळे स्पार्क, बीट क्रूझ, तवेरा या मोटारी 3 ते 15 हजार रुपयांनी महागल्या आहेत.
वाढ लागू
जाहीर केलेली किंमतवाढ सोमवारपासूनच अमलात आली आहे.
कारण काय?
विदेशी चलनात होत असलेले चढ-उतार आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ.

मॉडेल जुनी किंमत वाढ
मारुती (लाख रुपयांत) (रु.)
एसएक्स 4 7 ते 9.11 2,400
स्विफ्ट डिझेल 5.27 ते 6.47 17,000
ऑल्टो 2.32 ते 3.31 4,000
जनरल मोटर्स
तवेरा 6.62 ते 7.56 13000
स्पार्क 3.24 ते 4.04 3,000
बीट डिझेल 4.29 ते 5.45 10,500
क्रूझ 12 ते 14.50 15,000