आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maruti Suzuki Fired 500 Workers Manesar Plant To Start On 21 august

मारुतीचा मानेसर प्रकल्प पुन्हा सुरू होणार, 500 कामगारांची हकालपट्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुडगाव- मारुती सुझुकीने आपल्या मानेसर येथील कारखान्यातील टाळेबंदी उठवली आहे. येत्या 21 ऑगस्टपासून प्रकल्पातील उत्पादन पुन्हा सुरू होणार आहे. चेअरमन आर.सी. भार्गव यांनी गुरुवारी याची घोषणा केली.
18 जुलैपासून हा प्रकल्प बंद होता. हिंसाचाराच्या आरोपाखाली मारुतीने 500 कर्मचार्‍यांना कामावरून काढत असल्याची नोटीस जारी केली आहे. भार्गव म्हणाले, कर्मचार्‍यांची सुरक्षा ही सर्वात मोठी काळजी आहे. यामुळे हिंसेतील कर्मचार्‍यांना पुन्हा कामावर घेण्यात येणार नाही.
5.5 लाख वाहने वार्षिक निर्मिती
- प्रकल्पाची वार्षिक निर्मिती क्षमता 5.5 लाख वाहने.
- येथे विशेषत्वाने स्विफ्ट, डिझायर, एसएक्स 4 आणि ए-स्टार या मॉडेल्सचे उत्पादन होते.
- कारखान्यात तीन पाळ्यात सुमारे 3 हजार कामगार काम करतात, पैकी 1600 जण कायमस्वरूपी नोकरीत आहेत.
- याशिवाय सुमारे 700 जण हे व्यवस्थापकीय पातळीवरील आहेत. ते प्रकल्पाच्या आत काम करतात.
2.5 हजार कोटींचा फटका
- मानेसर कारखान्यात 18 जुलै रोजी पहिल्या शिफ्टमध्ये काम झाले होते. तेव्हपासून येथील उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले.
-टाळेबंदीमुळे येथून सुमारे 83 हजार वाहनांचे उत्पादन झाले नाही.
-यामुळे गुरुवारपर्यंत कंपनीला तब्बल अडीच हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.
घरापासून सुरक्षेचा घेरा
1 घरापासून कारखान्यापर्यंत आणि रस्त्यातही कर्मचार्‍यांना कडक सुरक्षा पुरवली जाईल.
2 कारखाना परिसरात हरयाणा रॅपिड अँक्शन फोर्सचे 500 पोलिस तैनात राहतील.
3 यापैकी 100 पोलिस प्रत्येक शिफ्टमध्ये कारखान्याच्या आतमध्ये असतील.
4 व्यवस्थापक, सुपरवायझर आदींच्या सुरक्षेसाठी 40 वैयक्तिक सुरक्षा कर्मचारी तैनात.
5 कारखाना परिसरात 100 खासगी सुरक्षारक्षकांना तैनात केले जाईल.
‘मारुती’ कारखान्यात टाळेबंदी; पोलिस चौकशी सुरुच
कार उत्पादनाला ब्रेक ; मारुती लवकरच करणार उत्पादनात कपात
मारुती आणणार स्वस्त कार, किंमत दीड लाख रुपये ?