आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marutis Manesar Plant Start Again On 21 August 546 Employees Fired

500 कामगारांची हकालपट्टी: 'मारुती'विरुद्ध कामगार आज रस्त्यावर उतरणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/गुडगाव- मारुती सुझुकीने मानेसर प्रकल्पातील पाचशे पेक्षा जास्त कामगारांची हकालपट्टी केली आहे. मारुती व्यवस्थापणाने तडकाफडकी घेतलेल्या हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगून कामगार संघटनेचे महासचिव कुलदीप कुमार यांनी आंदोलनाची धमकी दिली आहे. कंपनीकडून निलंबित करण्यात आलेले सर्व कर्मचारी गुडगाव येथे रॅली काढून निदर्शने करणार आहेत.
मारुतीने एकच वेळी 546 कर्मचार्‍यांना कामावरून काढल्याने त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. नोकरी गेल्याने कर्मचार्‍यांची भविष्य उद्धवस्त झाले आहे.
मारुती सुझुकीने आपल्या मानेसर येथील कारखान्यातील टाळेबंदी उठवली आहे. येत्या 21 ऑगस्टपासून प्रकल्पातील उत्पादन पुन्हा सुरू होणार आहे. चेअरमन आर.सी. भार्गव यांनी गुरुवारी याची घोषणा केली होती.
18 जुलैपासून हा प्रकल्प बंद होता. हिंसाचाराच्या आरोपाखाली मारुतीने 500 कर्मचार्‍यांना कामावरून काढत असल्याची नोटीस काढली आहे. भार्गव म्हणाले, कर्मचार्‍यांची सुरक्षा ही सर्वात मोठी काळजी आहे. यामुळे हिंसेतील कर्मचार्‍यांना पुन्हा कामावर घेण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट केले.
घरापासून सुरक्षेचा घेरा
>घरापासून कारखान्यापर्यंत आणि रस्त्यातही कर्मचार्‍यांना कडक सुरक्षा पुरवली जाईल.
>कारखाना परिसरात हरयाणा रॅपिड अँक्शन फोर्सचे 500 पोलिस तैनात राहतील.
>यापैकी 100 पोलिस प्रत्येक शिफ्टमध्ये कारखान्याच्या आतमध्ये असतील.
>व्यवस्थापक, सुपरवायझर आदींच्या सुरक्षेसाठी 40 वैयक्तिक सुरक्षा कर्मचारी तैनात.
>कारखाना परिसरात 100 खासगी सुरक्षारक्षकांना तैनात केले जाईल.
5.5 लाख वाहने वार्षिक निर्मिती
प्रकल्पाची वार्षिक निर्मिती क्षमता 5.5 लाख वाहने.
येथे विशेषत्वाने स्विफ्ट, डिझायर, एसएक्स 4 आणि ए-स्टार या मॉडेल्सचे उत्पादन होते.
कारखान्यात तीन पाळ्यात सुमारे 3 हजार कामगार काम करतात, पैकी 1600 जण कायमस्वरूपी नोकरीत आहेत.
याशिवाय सुमारे 700 जण हे व्यवस्थापकीय पातळीवरील आहेत. ते प्रकल्पाच्या आत काम करतात.
2.5 हजार कोटींचा फटका
मानेसर कारखान्यात 18 जुलै रोजी पहिल्या शिफ्टमध्ये काम झाले होते. तेव्हपासून येथील उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले.
टाळेबंदीमुळे येथून सुमारे 83 हजार वाहनांचे उत्पादन झाले नाही.
यामुळे गुरुवारपर्यंत कंपनीला तब्बल अडीच हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.
मारुतीचा मानेसर प्रकल्प पुन्हा सुरू होणार