आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Master Blaster Sachin Tendulkar And Congress Secretory Rahul Gandhi Is Neighbor At Delhi.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासदार सचिनला राहुल गांधींच्या शेजारचा व्हीव्हीवायपी बंगला!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली: मास्टर ब्लास्टर आणि राज्यसभेचे सदस्य सचिन तेंडुलकर आणि काँग्रेसचे युवराज राहुल गांधी एकमेकांचे शेजारी होणार आहेत. सचिनला दिल्लीत बंगला देण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. सचिनला तुघलक लाईनमधील बंगला क्रमांक 5 मिळणार आहे. याच लाईनमधील बंगला क्रमांक 12 राहुल गांधी यांचा आहे. दरम्यान, खासदार अभिनेत्री रेखा यांना कस्तुरबा गांधी मार्गावरील बलवंतराय मेहता लेनमधील बंगला नंबर 15 दिला जाण्याची शक्यता आहे.
खासदारांसाठी तयार करण्यात आलेल्या बहुमजली इमारतीमध्ये फ्लॅट घेण्यास रेखा यांनी आधी नकार दिला होता.
सचिनला झेड प्लस सुरक्षा दिली जाणार असल्याचे गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी सांग‍ितले. त्यामुळे सचिनला दिल्या जाणार्‍यां बंगल्याचे सुरक्षा एजन्सीकडून आधी निरीक्षण केले जाणार आहे. सात हजार स्कवेअर फीट परिसरात हा बंगला बांधला आहे. त्यात एक मोठे लॉन आणि सात शयन कक्ष आहे. या बंगल्यात आधी केंद्रीय गृह सचिव राहत होते.
खासदार रेखा यांनाही नवीन बंगला देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यांनाही राजधानीतील पॉश परिसर असलेल्या कस्तुरबा गांधी मार्गावर स्थित बलवंत राय मेहता लाईनमधील बंगला क्रमांक 15 दिला जाण्याची शक्यता आहे. खासदारांसाठी तयार केलेल्या बहुमजली इमारतीमधील एक फ्लॅट रेखा यांना दिला जाणार होता. परंतु तेथून कार्यालय लांब असल्याचे कारण पुढे करून रेखा यांनी तो नाकारला होता. सध्या रेखा मुंबईतील सी-स्प्रिंग बंगला क्रमांक 2, बीजे रोड, बांद्रा, मुंबई येथे राहत आहे.
'खासदार सचिनने केवळ क्रिकेटपुरते मर्यादित राहू नये'
सचिनच्या शपथविधीला लाचखाऊ खासदार उपस्थित
VIDEO : सचिन खासदार झाल्यावर काय म्हणाला, पाहा...