आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली/जयपूर - अवघ्या 13 वर्षांच्या शौर्यवर अमानुष अत्याचार करणारे त्याचे वडील आणि सावत्र आईला दिल्लीतील एका न्यायालयाने 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याशिवाय 50 हजारांचा दंडही ठोठावला आहे.
पिता ललित बलहारा आणि सावत्र आई प्रीतीने केलेल्या अत्याचाराचा पाढाच शौर्यने न्यायालयासमोर वाचला. वेळीअवेळी कशी मारहाण केली जात होती हेदेखील त्याने सांगितले. शौर्यचे आजोबा लेफ्टनंट कर्नल पी.एल. वर्मा, आजी सावित्रीदेवी आणि मामा कर्नल देवेंद्र यांनी 7 वर्षे ही न्यायालयीन लढाई दिली. आजी-आजोबांनी 2005 मध्ये दिल्लीतील सत्र न्यायालयात ललित व प्रीतीविरुद्ध खटला दाखल केला होता. मुलाच्या आईच्या मृत्यूनंतर वडील आणि सावत्र आईने त्याचा छळ केल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले होते. याच काळात मुलाचा ताबा मिळण्यासाठी त्यांनी केलेला अर्जही न्यायालयाने मंजूर केला. ललित बलहरा लष्करातील निवृत्त मेजर आहेत. दोघांविरुद्ध हत्येचा प्रयत्न, ज्युवेनाइल जस्टिस अॅक्टनुसार खटला चालवला गेला. न्यायालयाने 1 ऑगस्ट रोजी ललित व त्याची पत्नी प्रीतीला दोषी ठरवले. त्यानंतर दांपत्याला ताब्यात घेण्यात आले होते.
शौर्यची 16 हाडे मोडली - गुन्हा दाखल झाल्यावर डॉक्टरांनी शौर्यची तपासणी केली. तेव्हा शरीरातील 16 हाडे मोडल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या अनेक फासळ्या मोडलेल्या होत्या. डोक्याला मार बसल्याने मेंदूला दुखापत झाली होती. कवटीला फ्रॅक्चर आढळून आले होते. यावर ललित व प्रीतीने तो सोफ्यावरून पडल्याची मखलाशी केली होती. तोंडात लाटणे कोंबल्यामुळे त्याचे अनेक दात पडले आहेत. ओठ फाटलेले होते. त्याला प्रचंड धक्का बसलेला होता.
कीटकनाशक पाजले - शौर्य 2000 मध्ये दीड वर्षाचा होता तेव्हाच त्याची आई कॅप्टन मीनाक्षी यांचा मृत्यू झाला. 2002मध्ये वडिलांनी दुसरे लग्न केले. तेव्हापासून शौर्यवर अत्याचार सुरू झाले. 3 वर्षांचा असताना त्याला कीटकनाशक पाजण्यात आले होते.
लाटणे आणि तिखट - बेटर्ड बेबी सिंड्रोम आणि सेरेब्रल पाल्सीचा शौर्यला विकार आहे. वैद्यकीय तपासणीत तो 90 टक्के अपंग ठरला आहे. तो असा नव्हता, परंतु सावत्र आई व वडिलांनी त्याला तसे केले. शौर्यच्या म्हणण्यानुसार त्याच्या तोंडात लाटणे कोंबले जायचे. जास्त मारहाण केल्याने शरीराची उजवी बाजू निकामी झाली.
जन्मठेपेच्या कैद्याचा महिलेवर हल्ला
शिक्षकाकडूनच विद्यार्थिनींवर अत्याचार; क्लिपिंगही बनवली
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.