Home »National »Other State» Mauritius President Turns Emotional On Visiting Ancestral Village

मॉरिशस राष्ट्राध्यक्षांच्या डोळ्यात अश्रु

वृत्तसंस्था | Jan 07, 2013, 03:00 AM IST

  • मॉरिशस राष्ट्राध्यक्षांच्या डोळ्यात अश्रु

पाटणा - मै अपने परदादा की धरती पर आकर भावुक हूँ हे शब्द आहेत मॉरीशसचे राष्ट्राध्यक्ष राजके सवुर पुरयाग यांचे. रविवारी पुरयाग यांनी बिहारमधील आपल्या पूर्वजांच्या गावास भेट दिली त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अक्षरश: अश्रु तराळले.

पाटणा जिल्ह्यातील वाजिदपुर गावास पुरयाग यांनी रविवारी भेट दिली. त्यावेळी गावातील त्यांच्या नातेवाईकांनी आणि गावक-यांनी उत्सफूर्त स्वागत केले. वाजिदपूर गावास पुरयाग यांनी पत्नी अनिता यांच्यासह भेट दिली. त्यावेळी दूरच्या नात्यातील भाचे महेश आणि गणेश महातो यांनी राष्ट्राध्यक्षांशी गप्पा मारल्या. दिडशे वर्षांपूर्वी पुरयाग यांच्या पूर्वजांना ब्रिटीशांनी मॉरीशसमध्ये नेले होते.याबद्दल आठवण सांगताना पुरयाग म्हणाले की, रोजगार आणि चांगले आयुष्य घडवण्याचे आमिष दाखवून आमच्या पूर्वजांना मॉरीशसला नेण्यात आले.पण त्यांना सोन्याच्या खाणीत कामगार म्हणून कामास जुंपले. द्रारिद्रयाशिवाय त्यांना काहीही मिळाले नाही. मात्र आधुनिक मॉरीशस घडवण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची पाडले.

बिहारी असल्याचा अभिमान - बिहारचा कायापालट करून राज्याची प्रतिमा बदलल्याबद्दल नितीशकुमार यांचे पुरयाग यांनी कौतुक केले. केवळ भारतच नव्हे तर जगभरात बिहारच्या विकासाची चर्चा होते.त्यामुळे मूळ बिहारी असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो असे पुरयाग म्हणाले.

Next Article

Recommended