आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायावतींना निवडणूक आयोगाचा दणका, विचार करुन बोलण्याचा सल्ला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली । आपल्या व पक्षचिन्ह हत्तीच्या मूर्त्या झाकण्याच्या निर्णयावर निवडणूक आयोगावर टीका करणा-या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांना मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी यांनी चांगलेच खडसावले आहे.
मायावती या वरिष्ठ नेत्या आहेत, कोणतीही टिप्पणी करण्याआधी त्यांनी विचार करूनच बोलावे, असा सल्ला कुरेशी यांनी दिला. निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशात मायावती व त्यांचा पक्ष बसपाचे चिन्ह हत्तीच्या मूर्ती झाकण्याचा आदेश दिला आहे. या मुद्द्यावर मायावतींनी चांगलीच आगपाखड केली होती. आता निवडणूक आयोगाने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. मायावतींनी बेताल टिप्पण्या करू नयेत. यामुळे दुसरे पक्षही सरकारी उद्यानांत आपली निवडणूक चिन्हे उभारण्याची
मागणी करू शकतात. या पक्षांना आयोग काय उत्तर देईल, असा रोकडा सवालही त्यांनी उपस्थित केला. निवडणुकीच्या
घोषणा झाल्यानंतर सर्व पक्षांसाठी सारखे मैदान देणे, हे आयोगाचे काम आहे. आम्ही सर्वच मोठ्या नेत्यांच्या प्रतिमा झाकण्याचे आदेश देतो. यात मायावतींना सूट कशी देता येईल, असेही कुरेशी म्हणाले.