आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायावतींचा विक्रमी मायावी अवतार!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी एक नवा विक्रम आपल्या नावे प्रस्थापित केला आहे. उत्तर प्रदेशच्या 65 वर्षांच्या इतिहासात पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणा-या त्या पहिल्या मुख्यमंत्री ठरल्या आहेत.
गोविंद वल्लभ पंत यांच्यापासून मायावतींपर्यंत उत्तर प्रदेशने आतापर्यंत 34 मुख्यमंत्री पाहिले. एकूण 19 व्यक्तींकडे हे पद आळीपाळीने राहिले. यात काँग्रेसेतर पक्षाचे सात मुख्यमंत्री होते. त्यांनी राज्यावर 26 वर्षे सत्ता गाजवली. 12 मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे होते. त्यांचा कार्यकाळ 39 वर्षांचा होता.
मायावती, चंद्रभानू गुप्त आणि नारायणदत्त तिवारी या तिघांनी प्रत्येकी चार वेळा राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. मुलायमसिंह तीन वेळा तर कल्याणसिंह, चौधरी चरणसिंह आणि गोविंद वल्लभ पंत प्रत्येकी दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले.
जातीच्या राजकारणामुळे अस्थिरता : ब्रिटिश लेखक पॉल ब्रॉस यांच्या मते, स्वातंत्र्यानंतर 20 वर्षे या राज्यात सत्ता गाजवणा-या काँग्रेसमध्ये उफाळलेल्या गटबाजीमुळे येथे कधीच राजकीय स्थैर्य लाभले नाही. चरणसिंह जाट, अहीर आणि राजपूत या जातींना सोबत घेऊन होते तर कमलापती त्रिपाठी यांच्याकडे ब्राह्मणांचे नेतृत्व होते. संपूर्णानंद आणि गुप्त हे दोघे कायस्थ आणि वैश्य समाजात लोकप्रिय होते. या नेत्यांमध्ये नेहमीच मतभेद असायचे. यामुळे जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांना नेहमी उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री बदलावा लागत असे.

मायावतींनंतर डॉ. संपूर्णानंद
सरदार पटेल यांच्या निधनानंतर 1954 मध्ये गोविंद वल्लभ पंत यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिल्यावर त्यांच्या जागी डॉ. संपूर्णानंद यांना संधी मिळाली. त्यांचा पहिला कार्यकाळ 1957 मध्ये विधानसभा निवडणूकीपूर्वी संपुष्टात आला. निवडणुकीनंतर ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. मात्र 1960 मध्ये कमलापती त्रिपाठी आणि चौधरी चरणसिंह यांनी विरोध केल्यानंतर त्यांना पायउतार व्हावे लागले. मायावती यांच्यानंतर सर्वाधिक काळ हे पद सांभाळणारे संपूर्णानंद एकमेव माजी मुख्यमंत्री आहेत.