आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाडमेरमध्ये वायुसेनेचे लढाऊ मिग विमान क्रॅश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाडमेर- राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील नागाना भागात मंगळवारी दुपारी वायुसेनाचे एक लढाऊ विमान मिग 27 क्रॅश झाले. मात्र या कोणतीही जीवित हानी झाली नाही. पायलटने विमान क्रॅश होत असल्याचे लक्षात घेताच उडी मारली व आपला जीव वाचवला. पायलटला किरकोळ जखमा झाल्या असून त्याला प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संरक्षण विभागाचे प्रवक्ते एस डी गोस्वामी यांनी सांगितले की, विमानाचे नियमित प्रशिक्षण उड्डाण होते. उत्तरेकडील बेस लाईनपासून उड्डाण केल्यानंतर अलावाणीतील ढाणीजवळ हे विमान क्रॅश झाले. याबाबत सांगितले जात आहे की, तांत्रिक कारणामुळे क्रॅश झाले आहे. गोस्वामी यांनी सांगितले की, कोर्ट ऑफ इनक्वायरीचे आदेश दिले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, हे विमान एका उतारापासून 100 मीटर दूरवरच पडले. जर हे विमान उतारावर क्रॅश झाले असते तर, मोठी जीवीतहानी होण्याची शक्यता होती. कारण त्या उतारावरील भागात 500 ते 700 लोकांची लोकवस्ती आहे. क्रॅश झाल्यानंतर विमानाचे तुकडे इकडे-तिकडे पडले होते. काही तुकडे विजेच्या खांबावरही पडले.