आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुवाहाटीमध्ये अल्पवयीन मुलीला मारहाण करून केले बेअब्रू!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहाटी- एका अल्पवयीन मुलीला 20 जणांनी मारहाण करून तिला बेअब्रू केल्याची घटना घडली आहे. 'यू-ट्यूब'वरील व्हिडिओमुळे ही घटना उजेडात आल्याने पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
पोलिससूत्रांनुसार, गेल्या सोमवारी रात्री 20 पेक्षा जास्त लोकांनी एका अल्पवयीन मुलीची छेड काढली. तिने त्यांना विरोध केला. परंतु, त्यांनी तिला जबर मारहाण केली. एवढेच नाही तर तिच्या अंगावरचे कपडे फाडून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गुवाहाटीतील ख्रिश्चियन वस्ती भागात ही घटना घडली. पीडित मुलगी एका बारमधून पार्टी करून घरी परतत असताना सुरुवातीला तिला दोन तरूणांनी रस्त्यात अडवून तिची छेड काढली.
आसामचे सहायक आयुक्त जयंतो चौधरी यांनी सांगितले की, या प्रकरणी बार मालकाची चौकशी केली जाणार आहे. 'यू ट्यूब'वरील ‍व्हिडिओमुळे पोलिसांना आरोपींची ओळखही पटली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
गुन्हेगारांना कडक शिक्षा केली जाईल, अशी प्रतिक्रिया आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी दिली. बार, पब, हॉटेल आणि क्लबवर पोलिसांना लक्ष ठेवण्याचेही निर्देश दिले असल्याचे गोगोई यांनी सांगितले.
ब्‍ल्‍यू फिल्‍म दाखवून नागपुरात दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार
अल्पवयीन मुलीवर सलग 20 दिवस सामुहीक बलात्कार
मध्य प्रदेशात अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप करून ज‍िवंत जाळले
प्रेमविवाह करून पुण्यातील अल्पवयीन मुलीस विकले कुंटणखान्यात!
अल्पवयीन मुलीवर घरमालकाकडूनच सलग दोन वर्षे बलात्कार
सामुहिक बलात्कार करुन अल्पवयीन मुलीला जिवंत जाळले