आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्‍लीत पोलिस अधिका-याच्‍या मुलासोबत मित्रांनीच केला बलात्‍कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- देशाची राजधानी नवी दिल्‍ली महिलांसाठीच नव्‍हे तर मुलांसाठीही असुरक्षित बनली आहे. एका उच्‍च पदस्‍थ पोलिस अधिका-याच्‍या अल्‍पवयीन मुलावर त्‍याच्‍याच मित्रांनी अनैसर्गिक संभोग केला. एवढचे नव्‍हे तर त्‍याच्‍या घरातील महागड्या वस्‍तुंवरही त्‍यांनी डल्‍ला मारला.

प्राप्‍त माहितीनुसार, दिल्‍लीत पोलिस महानिरिक्षक पदावर हे अधिकारी आहेत. संपूर्ण परिवारासह ते दिल्‍लीत राहतात. गेल्‍या आठवड्यात ते पत्‍नीसोबत शहराबाहेर गेले होते. त्‍यांचा 17 वर्षीय मुलगा घरीच होता. आईवडिलांच्‍या अनुपस्थितीत त्‍याने मित्रांसह पार्टी केली. त्‍यात सर्वांनी भरपूर मद्यप्राशन केले. पार्टी संपल्‍यानंतर काही मित्र निघून गेले. परंतु, फहीम आणि जॉनी नावाचे दोन मित्र थांबले. दोघांनी त्‍याच्‍यावर बळजबरीने संभोग केला. परंतु, घरातील महागडे सामानही नेले.

गावावरुन परतल्‍यावर त्‍याच्‍या आईवडिलांना महागड्या वस्‍तू दिसल्‍या नाही. त्‍यामुळे त्‍यांनी तक्रार दाखल केली. या चौकशीमध्‍ये त्‍यांच्‍या मुलासोबत बळजबरीने अनैसर्गिक संभोग केल्‍याचे उघडकीस आले. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.