आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्ये रेल्वेगाडीत आमदाराला मारहाण, पत्नीची छेडछाड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - बिहारमधील आमदाराला रेल्वेगाडीत मारहाण आणि त्यांच्या पत्नीची छेडछाड झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे. जीआरपीने दोन आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपी ट्रेनी टीटीई आहेत.

दानापूर-हावडा रेल्वेत पाटणा सिटी ते फतुहा स्थानकादरम्यान ही घटना घडली. भाजपचे आमदार शिवेशकुमार राम यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री आपण पत्नी विजयलक्ष्मी आणि सहा महिन्यांच्या मुलीसह सेकंड एसीतून प्रवास करत होतो. समोरचे बर्थ रिकामे होते. यातील एक खासदारांच्या नावे आरक्षित होता. रेल्वे थांबताच आठ-दहा तरुण चढले. सगळे दारूच्या नशेत होते. अश्लील बोलत होते. रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा पत्नीशी छेडछाड केली. गोळी घालण्याची धमकीही दिली. नंतर गोंधळ ऐकून एका अधिकार्‍याचे अंगरक्षक आले, तेव्हा तरुण पळून गेले. घटनेनंतर एक तास रेल्वे बख्तियारपूरमध्ये थांबलेली होती.