आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीत आमदारावर त्याच्या कार्यालयात झाडल्या गोळ्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नजफगड भागाचे आमदार भरत सिंह यांच्यावर आज सकाळी साडेआठच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी दहा गोळ्या झाडल्या. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे आमदाराचे मामा ही जखमी झाले आहेत. १० गोळ्यापैकी तीन गोळ्या आमदाराला लागल्या आङेत. त्यातील दोन पोटात तर एक गोळी हाताला लागली आहे. आमदार यांची प्रकृती स्थिर असून, धोक्याच्या बाहेर असल्याचे म्हटले आहे.
तेथे उपस्थित असणा-यांनी सांगितले की, हल्लेखोर एका कारमधून आले होते. तसेच ते ४-५ जण होते. आमदरांचे मामा धर्मपाल सिंह हे घटनेवेळी कार्यालयात उपस्थित होते. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. भरत सिंह यांना जनकपुरी येथील चंदन देवी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिल्लीचे पोलिस आयुक्त बी. के. गुप्ता यांनी सांगितले की, या घटनेची चौकशी दिल्ली पोलिसाची विशेष टीम व क्राईम ब्रॅच करीत आहे. तसेच सर्व आमदारांच्या सुरक्षेची आवश्यक ती काळजी घेतली जाईल तसेच उपाययोजना करणार आहे.
ब्रह्मेश्‍वर सिंह यांच्‍यावर झाडल्‍या 40 गोळ्या, भोजपूरमध्‍ये संचारबंदी