आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाटणा- भारतरत्न पुरस्काराच्या स्पर्धेत आता चक्क बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांना देखील उतरवण्यात आले आहे. बिहार विधानसभेतील सत्ताधारी पक्षाच्या आमदार लेस्सी सिंग यांनी चक्क नितीशकुमारांनाच भारतरत्न देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
नितिश कुमारांच्या करिष्माई नेतृत्वाने बिहारमध्ये अविश्वसनीय प्रगती केली आहे, त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, असे मागणी करताना त्यांनी म्हटले. बिहारचे राज्यपाल देवानंद कोणवार यांच्या विधान सभा आणि विधान परिषदेच्या संयुक्त अधिवेशनादरम्यानच्या भाषणावेळेस त्यांनी काल ही मागणी केली. राज्याच्या विकासासाठी नितिश कुमारांनी मोठे काम केले आहे. बिहारच्या जनतेला विकासाबाबतीत त्यांनी आश्वस्त केले आहे. त्यामुळेच त्यांना भारतरत्न देण्यात यावे, असे त्यांनी यावेळी म्हटले.
यंदा कोणालाच 'भारतरत्न' नाही?
'क्रिकेटपटू, बॉलिवूड कलाकारांना भारतरत्न देणे म्हणजे पुरस्काराची खिल्ली उडवणे'
सचिनला भारतरत्न देण्यासाठी हजारेंची 'अण्णागिरी'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.