आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोबाइल कॉल 30 पैशांनी महागणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आगामी काळात मोबाइल कॉल दर 30 पैसे प्रति मिनिटांनी वाढू शकतात, असा इशारा मोबाइल कंपन्यांची संघटना सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (सीओएआय) शुक्रवारी दिला आहे. 2 जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची किंमत सरकारने 14 हजार कोटी रुपयांचे बेस प्राइस मूल्य निर्धारित केल्यानंतर मोबाइल कंपन्यांनी हा इशारा दिला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत टू जी स्पेक्ट्रमचा लिलाव 14 हजार कोटी रुपये या किमान पातळीवरून सुरू होईल, असा निर्णय घेण्यात आला. सीडीएमए सेवांसाठी ही किंमत 18 हजार 200 कोटी ठेवण्यात आली आहे. सीओएआयने या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या किमतीच्यावर व्यवसाय करणे कठीण आहे. त्यामुळे नाइलाजाने मोबाइलचे कॉल दर सरासरी 30 पैसे प्रतिमिनिट या प्रमाणे वाढवावे लागतील, असा इशारा कंपन्यांनी दिला आहे. टू जी स्पेक्ट्रमचा पुन्हा लिलाव करण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका युनिनॉर, एमटीएस या कंपन्यांना बसणार आहे.
आता मोबाईल खरेदी करणे होणार महाग!
मोबाईल कॉलचे दर २० टक्क्यांनी वाढले
नोकियाला पछाडून सॅमसंग बनली नं. 1 मोबाईल विक्रेती कंपनी