आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोबाइलच्या ‘एबीसी’वर कोट्यवधी रुपये खर्च

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - ‘तुमचा आजचा दिवस कसा जाणार? एसएमएस करा मासिक शुल्क फक्त तीस रुपये’ असा किंवा याच आशयाचे अनेक एसएमएस तुमच्या मोबाइलवर दररोज झळकत असतात. क्रिकेट सामन्याच्या अपडेट स्कोअरसाठी मेसेज अलर्ट किंवा तुमच्या आवडीच्या बॉलीवूड स्टारचे नवे गाणे किंवा फोटो डाऊनलोड करण्याची सुविधाही तुम्हाला तुमची मोबाइल कंपनी पुरवते. मोबाइल भविष्याचा तुम्हाला कितपत फायदा होतो याबाबत साशंकता असली तरी, मोबाइल कंपन्यांना मात्र या सुविधेच्या माध्यमातून मोठा फायदा होत आहे.
नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार मोबाइलवरील ‘अ‍ॅस्ट्रॉलॉजी’, ‘बॉलीवूड’ व ‘क्रिकेट’ या एबीसी सुविधांवरून भविष्य, क्रिकेट अलर्ट मिळवण्यासाठी मोबाइलधारकांनी या वर्षी सुमारे साडे तीन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च केली आहे. याशिवाय गाणी ऐकणे, रिंगटोन, वॉलपेपर आदी सुविधांसाठी देशभरातील मोबाइलधारकांनी सुमारे 26 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. पुढील वर्षी या खर्चात वाढ होऊन तो 33 हजार 280 कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे व्हॅल्यू अ‍ॅडेड सुविधांना मोबाइल कंपन्यांच्या बाजाराचे भविष्य म्हटले जाते. इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाने व्हॅल्यूअ‍ॅडेड सेवांसंदर्भात आयएमआरबी या सर्वेक्षण करणा-या कंपनीकडून हे सर्वेक्षण करून घेतले होते.
व्हॅल्यू अ‍ॅडेड सुविधांच्या ग्राहकांची संख्या नवीन मोबाइल ग्राहकांच्या तुलनेत झपाट्याने वाढत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. सर्वसामान्य ग्राहकही या सुविधांचा लाभ सहल घेऊ शकत असल्याने अशा ग्राहकांची संख्या वाढत आहे. सध्या मोबाइल कंपन्यांना या एसएमएस सुविधांच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न एकूण मोबाइल मार्केटच्या 27 टक्के एवढे आहे.
मोबाइल पर्सनल असिस्टंट - मोबाइल हा फक्त संपर्काचे साधन न राहता मनोरंजन व ज्ञानवर्धक सेवा पुरवणारे साधन असावे याकडे मोबाइल कंपन्यांचा कटाक्ष आहे. मोबाइल हा ग्राहकाचा स्वीय सहायक व्हावा असा या कंपन्यांचा प्रयत्न आहे. प्रामुख्याने तरुण वर्गाच्या दृष्टीने या सेवा पुरवल्या जात आहेत.’’
रजनीश कौल, सीईओ, भारती एअरटेल(म.प्र. व छ.ग.)