आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींएवढी बदनामी कोणाची झाली नाही- लालकृष्ण अडवाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगमधून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची पाठराखण केली आहे. नरेंद्रभाई मोदी यांच्याप्रमाणे इतिहासात कोणत्याही नेत्याला एवढ्या सुनियोजित पद्धतीने बदनाम करण्यात आले नाही, असे अडवाणी यांनी लिहिले आहे.
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या ‘टर्निंग पॉइंट्स’ या पुस्तकातील काही मजकुराचा अडवाणी यांनी संदर्भ दिला आहे. अडवाणी लिहितात की, कलाम यांनी पुस्तकात आपल्या दौºयावर बहिष्कार टाकला जाण्याची शंका उपस्थित केली आहे. परंतु दुसºयाच ओळीत त्यांनी आपला अनुभव वेगळा राहिल्याचे म्हटले आहे. मोदी आणि त्यांच्या सरकारने मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले.
रिपोर्टिंगवर प्रश्नचिन्ह - अडवाणी आपल्या ब्लॉगमध्ये लिहितात, गेल्या आठवड्यात कलाम यांच्या पुस्तकाच्या हवाल्याने काही बातम्या प्रसिद्ध झाल्या. पंतप्रधान वाजपेयी गुजरातेतील मोदी सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत होते, असे त्यात लिहिले आहे.
संघानंतर आता अडवाणी यांनीही केली मोदींची पाठराखण