आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजनाथ सिंह यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. मोदी यांच्या स्वागतासाठी स्वतः राजनाथ सिंह उपस्थित होते. त्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाली.
मुख्यमंत्री मोदी विशेष विमानाने दिल्लीला आले. भाजपच्या या दोन दिग्गज नेत्यांची भेट दिल्लीच्या राजकीय वर्तूळात महत्त्वाची मानली जात आहे. नुकतेच अध्यक्ष झालेल्या राजनाथ सिंह यांना मोदींची पसंती नव्हती. सुत्रांच्या माहितीनुसार कॉन्फ्रंस कॉलवर झालेल्या बैठकीत मोदींनी आपले वजन अरुण जेटली आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांच्या पारड्यात टाकले होते.
राजनाथ सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची औपचारिक घोषणा झाल्यानंतर मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. ट्विटरवर मोदी म्हणाले होते, 'माझी राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा झाली आणि मी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचे प्रशासन कौशल्य उत्तम आहे, त्यासोबतच त्यांचा संघटनेमधील अनुभव दांडगा आहे.' दुस-या एका ट्विटमध्ये मोदी म्हणाले, 'राजनाथ सिंह हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री राहिले आहेत. शेतक-यांच्या समस्या मांडण्यासाठी ते कायम तत्पर राहिलेले आहेत. त्यांच्या निवडीचा भाजपला नक्कीच फायदा होईल.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.