आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी धर्मनिरपेक्षच! यशवंत सिन्हांपाठोपाठ जेठमलानींची स्तुतिसुमने

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/मुंबई- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी अगदी योग्य उमेदवार असल्याची पावती ज्येष्ठ विधिज्ञ व भाजपचे निलंबित नेते राम जेठमलानी यांनी मंगळवारी दिली. मोदी शंभर टक्के धर्मनिरपेक्ष असल्याचेही त्यांनी ठासून सांगितले. दरम्यान, मोदींचे वारे असे वेगात असताना शिवसेनेने मध्येच सुषमा स्वराज यांचे नाव पुढे करून पंतप्रधानपदाच्या स्पर्धेला नवी फोडणी दिली आहे.


राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) पंतप्रधानपदाचा उमेदवार अजून ठरलेला नाही. मात्र, भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी सोमवारी या संदर्भात वातावरण तापवण्यास सुरुवात केली. मोदींना त्यांनी या सर्वोच्च राजकीय पदासाठी उमेदवार जाहीर करून टाकले. जेठमलानी यांनी मोदींच्या नावाला पाठिंबा देत निवडणुकीपूर्वीच या पदासाठी नाव जाहीर केले पाहिजे, असा सल्लाही दिला. निवडणुकीनंतर पंतप्रधान ठरवण्याचे निश्चित झाले तर पक्षाचे नुकसान होईल, असा इशाराही त्यांनी दिला.