आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळ्यात ‘मोदी मंत्र’, संघाचीही साथ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद/नवी दिल्ली - महाकुंभमेळ्यात गुरुवारी विश्व हिंदू परिषदेच्या ‘धर्म संसदेत’ नरेंद्र मोदींच्या नावाचाच बोलबाला होता. पंतप्रधानपदासाठी साधू-संतांनी मोदींच्या नावाची घोषणा व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली. मोदींच्या बाजूने वातावरण निर्मितीचा प्रयत्न बैठकीत झाला असला तरी तसा अधिकृत प्रस्ताव मात्र संमत झाला नाही.
धर्म संसदेत सरसंघचालक मोहन भागवत यांनी या मुद्द्याला बगल दिली. निर्णय घेणारे तो घेतील, असे सांगत त्यांनी चेंडू भाजपच्या कोर्टात टोलवून दिला. तथापि, या ठिकाणी उपस्थित झालेला मुद्दा म्हणजे सबंध देशाचा आवाज असल्याचेही सांगत भागवत यांनी अप्रत्यक्षपणे मोदी यांच्या नावाला पाठिंबा दर्शवला.