आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पंडित नेहरु - इंदिरा गांधींच्या तुलनेत अटलबिहारी वाजपेयी यशस्वी पंतप्रधान\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेस पक्ष वाळवी सारखा देशात पसरलेला आहे. एका ठिकाणी त्याला संपविण्याचा प्रयत्न केला तर तो दुसरीकडे पसरतो. ही वाळवी संपवायची असले तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घाम गाळला पाहिजे, असे आवाहन भाजप नेते आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या दुसर्‍या आणि शेवटच्या दिवशी ते बोलत होते. त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना नाईट वॉचमन आणि काँग्रेस नेतृत्वावरही टीका केली आहे.

मोदींच्या काँग्रेस आणि गांधी परिवारावरील टीकेनंतर काँग्रेस नेत्यांनीही मोदींवर जहरी टीका केली आहे. मणिशंकर अय्यर यांनी मोदींना साप आणि विंचू म्हटले आहे तर, राजीव शुक्ला यांनी दुटप्पी राजकारण करत असल्याची टीका केली आहे.

स्वातंत्र्यापासून आतापर्यंत जेवढे पंतप्रधान झाले त्यात सर्वाधिक यशस्वी पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांचेच नाव घ्यावे लागेल असे लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटले आहे.
अडवाणी म्हणाले, पहिले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरु प्रसिद्ध असले किंवा बांगलादेशच्या कारवाईनंतर इंदिरा गांधींचे जागतिक स्तरावर नाव झाले असले तरी, देशाच्या विकासासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला तर सर्व पंतप्रधानांमध्ये वाजपेयी सर्वात वरती असलेले दिसतात.

मोदींनी काँग्रेस आणि गांधी परिवारावर जोरदार शरसंधान केले. ते म्हणाले, काँग्रेसचे सरकार हे भाजप कार्यकर्त्यांपुढचे मोठे आव्हान आहे. गरीबांच्या घरची चुल पेटत नाही. याची माहिती देखील या सरकारला नाही.
काँग्रेस नेतृत्वात देशाला पुढे नेण्याची ताकत नसल्याची टीक त्यांनी केली. ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतर तीन दशक ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंत काँग्रेसचा तिरंभा फडकत होता. मात्र, कोरिया, चीन आणि इस्त्राईलसारखे देश आपल्या पुढे गेले आहेत.
काँग्रेसने कधीच देशाच्या विकासाचे काम केलेले नाही. केवळ एका परिवारासाठी देशाला वेठीस धरणे हीच काँग्रेसची परंपरा राहिली आहे. काँग्रेसने देशाची विल्हेवाट लावली आहे असा आरोप त्यांनी केला. सोनिया गांधींवर टीका करतांना मोदी म्हणाले, काँग्रेस अध्यक्षांनी निवडलेली माणेस पाहा, सीताराम केसरी यांना काँग्रसचे अध्यक्ष केले गेले, केवळ नाईट वॉचमन प्रमाणे त्यांचे पद होते. नंतर त्यांना उचलून फेकले आणि स्वतः काँग्रेसचा ताबा घेतला. इतर कोणत्याही राजकीय पक्षात अशी लोकशाही पाहायला मिळणार नाही. त्यानंतर केंद्रात सरकार स्थापनेची वेळ आली तेव्हा असा पंतप्रधान निवडण्यात आला जो या परिवारासाठी सांगेल ते करेल. त्यामुळे पंतप्रधान स्वतः काहीच करु शकत नाहीत. त्यांना राष्ट्रीय सल्लागार समितीची (एनएसी) मदत घ्यावी लागते. या एनएसी मार्फतच सरकार चालवले जात आहे. जो कोणी या परिवारासाठी धोकादायक ठरु शकतो त्याची राजकीय कारकिर्द संपूष्टात आणली जाते.

प्रणव मुखर्जींना पंतप्रधान का केले नाही ?
मोदींनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची आश्चर्यकारकरित्या स्तुती केली. त्याचवेळी त्यांनी गांधी परिवारावर सडेतोड टीका केली.
ते म्हणाले, माझ्या पक्षाचे विचार काय आहेत, मला माहित नाही. मात्र, मनमोहन सिंग यांच्या ऐवजी प्रणव मुखर्जी पंतप्रधान झाले असते तर देशाचे वाट्टोळे झाले नसते. सोनिया आणि राहुल गांधी यांचे नाव न घेता ते म्हणाले, प्रणवदा पंतप्रधान झाले असते तर, आपले काय होईल याची भीती काँग्रेस नेतृत्वाला होती. मात्र, प्रणवदा पंतप्रधान झाले असते तर, देशाने प्रगती केली असती, त्यांना देशाच्या राजकारणाची, समाजकारणाची पूर्ण जाणीव आहे. देशातील समस्यांची उत्तरे शोधण्याची त्यांच्यात ताकत आहे. मात्र, काँग्रेसची परंपरा पाहिली तर सर्वाधिक पंतप्रधान गांधी परिवाराशी संबंधीत लोकच झाले आहेत. अटलबिहारी वाजपेयी हे काँग्रेसेतर पंतप्रधान होते. त्यांनी या देशाला पंतप्रधान कसा असावा याचा परिपाठ घालून दिला आहे.

माना अंधेरा घना है,
लेकिन दिया जलाना कहा मना है.


या कवितेच्या ओळी सांगत मोदींनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, मित्रांनो चला कमळाच्या साथीने काँग्रेसचा अंधकार दूर करू आणि देशाला नवा प्रकाश दाखवू, या आवाहनाने त्यांनी आगामी लोकसभा निवडणूकीचे रणशिंगच फूंकले आहे.

या परिषदेच्या पहिल्या दिवशी शनिवारी भाजप अध्यक्ष राजनाथसिंग यांनी मोदींचे जाहीर स्वागत केले होते. मुख्यमंत्रीपदाची हॅट्ट्रीक करणारे भाजपचे ते एकमेव नेते असल्याचे गौरोद्गात त्यांनी काढले. त्यानंतर त्यांचा पुष्पहार देऊन सत्कार केला. त्याचा उल्लेख करुन मोदी म्हणाले, गुजरातचा विजय हा एका व्यक्तीचा विजय नाही तर, तो भारतीय जनता पक्ष आणि पक्षातील नेतृत्वाने केलेल्या मार्गदर्शनाचा विजय आहे. त्याबद्दल माझा जो सन्मान करण्यात आला त्याचे खरे दावेदार देशातील लाखो कार्यकर्ते, गुजरातची जनता आणि पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व आहे. माझा सन्मान, माझा सत्कार मी या सर्वांच्या चरणी अर्पण करतो.

(पुढील स्लाईडमध्ये वाचा, मणिशंकर अय्यर, राजीव शुक्ला यांनी काय म्हटले मोदींना. )