आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसशी हातमिळवणी करु शकतात नितीशकुमार, मोदींचा केंद्रावर हल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नितीशकुमार आणि नरेंद्र मोदी यांचा राजकीय वाद संपायचे नाव घेत नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांनी एनडीएसोबतचे संबंध संपुष्टात आणण्याचे संकेत दिले तर, गुजरातचे मुख्यमंत्री मोदींनी केंद्र सरकारच्या धोरणावर जोरदार हल्ला केला आहे.
एका नियतकालिकाने दावा केला आहे की, जर भारतीय जनता पक्षाने मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषीत केले तर, लोकसभा निवडणूकीनंतर नितीशकुमार एनडीएची साथ सोडून काँग्रेसशी हातमिळवणी करु शकतात. 'द वीक' या नियतकालिकाने नितीशकुमारांच्या हवाल्याने हा दावा केला आहे. मात्र, नितीशकुमारांनी 'द वीक'ला मुलाखत दिली नसल्याचे म्हटले आहे.
'द वीक'ने नितीशकुमारांच्या हवाल्याने म्हटले आहे की, भाजप मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार करणार असेल तर एनडीएमध्ये राहण्यात आम्हाला रस नाही. जर काँग्रेसने आमच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले तर लोकसभा निवडणूकीनंतर त्यांना समर्थन दिले जाईल. नियतकालिकाने म्हटले आहे की, नितीशकुमार अजूनही स्वतःला बिहारच्या राजकारणापर्यंतच मर्यादीत ठेऊ इच्छित आहेत. बिहारचा विकास हेच त्यांचे ध्येय आहे.
\'नरेंद्र मोदी २०१४ ला नसतील एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार\'
दर्डांची कोलांटउडी, \'नरेंद्र मोदी राष्ट्रीय संत नाही, राष्ट्रीय कलंक\'
मोदी, नितीशपेक्षा पंतप्रधानपदासाठी शरद यादव व सुषमा उजव्या!- गोविंदाचार्य