आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंदिरा गांधींना 'पापी' संबोधून नरेंद्र मोदींचे घुमजाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली: गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांना 'पापी' असे संबोधून त्यांना टार्गेट केले होते. परंतु, आपण केलेले वक्तव्य आता आपल्याच अंगाशी येत असल्याचे पाहून मोदींनी घुमजाव केले आहे. आपण इंद‍िरा गांधी यांच्याबाबत नाही तर त्यांच्या पक्षावर टीका केली, असल्याचे सांगून मोदींनी बचावात्मक पवित्रा घेतला आहे.
इंदिरा यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य करताना म्हटले की, त्यांनी व काँग्रेसने एके काळी देशात चुकीचे राजकीय धोरण (मेनिफेस्टो) राबविले होते.
नॉर्थ ईस्ट लोकांच्या सम्मेलनात भाग घेण्यासाठी आलेल्या मोदी यांनी म्हटले की, मी समजतो की इंदिरा गांधी यांनी खूपच मोठे पाप केले आहे. ज्या भागातून त्या निवडणूक लढवित असत तेथे त्या अनेक गोष्टी सांगत. मात्र मी आता तुम्हाला एकच गोष्ट सांगेन. काँग्रेसने आपल्या मेनिफेस्टोत म्हटले होते की, जे स्वताला धर्मनिरपेक्ष असल्याचा दावा करतात तेथे आम्ही निवडणूक जिंकू. तसेच तेथे बायबलच्या नियमानुसार सरकार चालवू.
'मी एकच गोष्ट सांगेन, पण तशा तर अनेक गोष्टी आहेत' असे मोदीने बोलताच तेथील वातावरण एकदम सुन्न झाले. तसेही गुजरातचे मुख्यमंत्री मोदी काँग्रेसवर हल्ला करण्याचा एकही निशाना सोडत नाहीत. पण सध्याच्या काळात ते सोनिया गांधी, मनमोहन सिंग किंवा राहुल गांधी असतात. मात्र त्यांनी आता इतिहासात जावून इंदिरा गांधीसह काँग्रेसची धोरणी देशात कशी चुकीची राबविली गेली, हे सांगण्यात रस दाखवत आहेत.
मोदींनी सांगितले की, इंदिरा गांधींनी पूर्वोत्तर राज्यांना भारतापासून दूर नेण्याचे काम केले. स्वतंत्र्यपूर्व काळात पूर्वेकडील राज्यांनी मोठे योगदान दिले आहे. मात्र काँग्रेसने त्याकडे जाणून-बुझून दुर्लक्ष केले. गांधी घराण्यावर निशाना साधत मोदी म्हणाले, या एका घराने तिकडे लक्ष दिले असते काय फरक पडला असता?. पंतप्रधान मनमोहनसिंग हे आता त्या परिवाराप्रमाणेच काम करीत आहेत. कारण ते आसाम राज्यातून गेली २० वर्ष राज्यसभेवर जात असले तरी त्यांनी पूर्वेकडील राज्यांना न्याय दिला नाही. ते म्हणाले, अरुणाचल प्रदेशच्या सीमा भागेवर भारतीय हद्दीत तेथील स्थानिक लोकांना चीनच्या मोबाईल कनेक्टिविटी वापरावी लागत आहे. पाकिस्तानच्या लगत कच्छच्या भागात आज पाकिस्तानी कार्यक्रम बघावे लागतात. कारण या भागात शक्तीशाली सॅटेलाईट टॉवर उभे केले नाहीत. जर सरदार वल्लभभाई पटेल अजून काही दिवस सत्तेत राहिले असते तर पूर्वेकडील राज्यांची उपेक्षा झाली नसती.
दरम्यान, काँग्रेसने मोदींवर धर्मावर आधारित राजकारण करीत असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचे खासदार प्रभा ठाकूर यांनी मोदीवर तोंडसुख घेताना म्हटले आहे की, मोदी धर्म आणि जातीच्या नावावर लोकांची दिशाभूल करीत आहेत. त्यांना हे सांगावे लागेल की, हा मेनिफेस्टो कोणत्या वर्षाचा होता. मोदींने जे इंदिरा गांधी यांच्यावर आरोप केले होते जे त्यांनी स्पष्ट करावे की, कोणत्या निवडणुकीत काँग्रेसने घोषणापत्रात असे म्हटले होते.
काँग्रेस प्रवक्ते रशिद आल्वी यांनीही मोदींना जातीयवादी ठरवित, इंदिराजींवर असे आरोप करणे क्लेशदायक असल्याचे म्हटले आहे.
त्या अशा पंतप्रधान होत्या ज्यांचा संपूर्ण जग आदर करीत होते. जर भाजपने मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनविले तर देशाने काहीही अपेक्षा ठेवू नये. कारण देशाच्या पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर जातीय व धर्मवादी व्यक्ती बसल्यास काय होईल याची कल्पना देशातील लोकांनी केली असेल.
भाजपात पोस्टर वॉर : नरेंद्र मोदी- संजय जोशी संघर्ष पेटणार?
पंतप्रधानांचे ईशान्य राज्यांकडे दुर्लक्ष: मोदी यांचे टीकास्‍त्र
संघाने साधला नरेंद्र मोदींवर निशाणा
भाजपच्या तंबूत नरेंद्र मोदींचा उंट (कुमार केतकर)