आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SRCC मध्ये चमकले नरेंद्र मोदी; जबरदस्त वाणीने जिंकली तरुणाईची मने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील श्रीराम कालेज ऑफ कॉमर्स (एसआरसीसी)मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत तरुणाईची मने जिंकली. त्यांच्या भाषणांचे कौतुक म्हणून विद्यार्थ्यांनी त्यांना उभे राहून ('स्टँडिग ओव्हेशन'
दिले) अभिवादन केले.

त्याआधी श्रीराम कॉलेजच्या बाहेर डाव्या चळवळीतील विद्यार्थ्यांच्या संघटनांनी मोदींना विरोध दर्शिवला. मोदी यांचे महाविद्यालयात व्याख्यान असल्यामुळे तेथे कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. मोदी सध्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. मोदी यांनी आपल्या भाषणात देशाचा विकास, व्हिजनरी नेतृत्त्व, उद्योग, तंत्रज्ञान, उत्पादन, शेती, पाणी या सर्व महत्त्वाच्या घटकाला स्पर्श करीत देशाची स्थिती व जागतिक स्थान याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोदी म्हणाले, देशाला स्वतंत्र्य मिळून 65 वर्षे झाली पण देशातील नागरिकांना आजही स्वराज मिळाले नाही. महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत निर्माण झाला नाही. मात्र, मी गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून स्वराज राज्य तयार करण्याचा प्रयत्न केला. गुजरातच्या विकासाचे नाव आज जगभर घेतले जात आहे. परदेशातही गुजरातमधील दुध, कापूस व इतर वस्तू व पदार्थ सहज मिळत आहेत. हे करताना मी केवळ चांगले प्रशासन देण्याचा प्रयत्न केला. याचबरोबर आमच्या सरकारने कृषी, सेवा व उद्योग क्षेत्रातही कमालीची सुधारणा केली. शेतक-यांना पाणी उपलब्ध करुन दिले. त्यामुळे गुजरातमध्ये पाण्याची व भुजल पातळी वाढली आहे. याचा फायदा म्हणून गुजरातने आज १० टक्क्यांपेक्षा जास्त विकास दर राखला आहे. शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्याचा आमचा प्रयत्न असून, फक्त गुजरातमधील शेतक-यांना आम्ही स्मार्ट कार्ड दिले असल्याचे मोदी यांनी सांगितले.