आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचा गोध्रात सद्भावना उपवास

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोध्रा - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गोध्रा येथे सद्भावना उपवास केला. गोध्रा येथे साबरमती रेल्वे जळीत कांडाला पुढील महिन्यात दहा वर्षे पूर्ण होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी आज उपवास केला आहे. भारतीय जनता पक्षाने नियोजन केल्याप्रमाणे उपवास कार्यक्रमाला अल्पसंख्याक समुदायातील नागरिक त्या प्रमाणात उपस्थित नव्हते. येथील एसआरपी मैदानावर उपवासाचे आयोजन करण्यात आले.
शांतता, सौहार्दता आणि बंधूभाव निर्माण करण्यासाठी उपवास करण्यात आला. त्याआधी सामाजिक कार्यकर्ते शबनम हाशमी आणि अन्य पाच एनजीओ कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. दुसरीकडे मोदी यांच्याविरोधात गोध्रामध्ये रॅली काढण्याची घोषणा करणारे माजी भाजप नेते नलिन भट्ट यांना त्यांच्या बडोदा येथील घरातून सकाळी ताब्यात घेण्यात आले. मोदी यांच्या बाजूला मुस्लिम समुदायातील काही नेते बसले होते. या समुदायातील गाचिस आणि बोहरा समाजातील नेतेही उपवासस्थळी उपस्थित होते. या कार्यक्रमाला मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी आशा पंचमहला जिल्ह्याचे अध्यक्ष जयप्रकाश पटेल यांनी व्यक्त केली होती, मात्र त्याप्रमाणात त्यांची संख्या नव्हती.
नरेंद्र मोदी सकाळी 11.00 वाजता उपोषण स्थळी आले तेव्हा स्थानिक आमदार, भाजप नेते आणि काही धर्मगुरुंनी त्यांचे स्वागत केले. उपवासाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. 1600 पोलिस कर्मचारी आणि 50 विशेष प्रशिक्षित चेतक कमांडोज तैनात करण्यात आले होते. परवानगी न देता सार्वजनिक कार्यक्रम घेणाºया सहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.