आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभेच्या प्रचार मोहिमेला मोदींची आजपासून सुरुवात ; शिवराजसिंगांचा मात्र अडथळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर/भोपाळ/नवी दिल्ली- भाजपतर्फे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव आघाडीवर असल्याचे मिळत असलेले संकेत आणि यावरुन पक्षाच्या नेत्यांकडून होत असलेली वेगवेगळी वक्तव्ये या पार्श्वभूमीवर मोदी बुधवारी (६ फेब्रुवारी) दिल्लीत दाखल होणार आहेत. तेथे मोदी यांचा श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स (एसआरसीसी) च्या विद्यार्थ्यांना भेटणार असून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. यावेळी मोदी विद्यार्थ्यांना प्रशासनासंबंधित प्रश्न विचारतील तसेच नंतर उत्तरेही देतील. मोदी यांचा हा कार्यक्रम म्हणजे पुढील लोकसभेची निवडणुकीची अनौपचारिक तयारी व प्रचार अभियानाची सुरुवात म्हणून भाजप याकडे पाहत आहे. याबाबत सांगितले जात आहे की, युवा वर्गात मोदी लोकप्रिय असून त्यात आणखी वाढ करण्यासाठी भाजपच्या नेत्यांतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

देशभर दौरा करणार : याबाबत सांगितले जात आहे की, लोकसभा निवडणुका प्रचाराची जबाबदारी मोदींकडे सोपविण्याची तयारी भाजपने केली आहे. त्यामुळे मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारी म्हणून काही लक्ष्य ठेवले आहे. यात युवा मतदारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. याच अभियानाला आकार देण्यासाठी मोदींनी आता प्रत्यक्ष सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. याचबरोबर मोदी देशव्यापी दौरा करणार असून युवकांना भेटणार आहेत. भाजपमध्ये मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला मिळणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा व मोदी यांची सक्रियता खूप काही सांगून जात आहे.
शिवराजसिंगबाबत वाचा पुढे, क्लिक करा...